kolhapur shiv sena protest cpr 
कोल्हापूर

...अन्यथा खुर्चीवर बसणे मुश्‍कील ; शिवसेनेचा अधिकाऱ्यांना इशारा  

शिवाजी यादव

कोल्हापूर - "" सीपीआर रूग्णालयात केवळ भूलतज्ञ नाही म्हणून कोणाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या त्यातून एखाद्याचा मृत्यू झाला तर सीपीआर आवारातून मृतदेह हालू देणार नाही, तुमच्यातील हट्ट तुम्ही सोडावा पण भूलतज्ञांची व्यवस्था तातडीने सक्षम करा, अन्यथा खुर्चीवर बसणे मुश्‍कील होईल.'' अशा कडक शब्दात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार व विजय देवणे यांनी सीपीआर प्रशासनाला धारेवर धरले. 

भूलतज्ञ नाहीत म्हणून गेल्या महिन्याभरापासून सीपीआर रूग्णालयाच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. त्या तातडीने सुरू कराव्यात या मागणीसाठी शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे शिष्ठमंडळाने अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची भेट घेतली. तेव्हा खडाजंगी चर्चा झाली.

हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष उच्च शिक्षण घेतलेल्या भूलतज्ञांची गरज असते तसे प्रशिक्षण डॉ. आरती घोरपडे यांनी घेतले आहे. मात्र त्या हृदयशस्त्रक्रिया विभागात स्वतः सेवा देत नाहीत व अन्य भूलतज्ञांचीही ड्युटी लावत नाहीत. यावर डॉ. घोरपडे म्हणाल्या अधिष्ठाताचे पद मला संभाळावे लागते तसेच राज्य शासनाकडेही जादा भूलतज्ञ नियुक्तीबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. यावर हृदयशस्त्रक्रिया विभागाचे डॉ. किशोर देवरे व डॉ. अक्षय बाफना यांनी आक्षेप नोंदविला. गेली दहा वर्षे कोणताही एक भूलतज्ञ देण्यात येतो त्याला आम्हीही प्रशिक्षण देऊन त्याच्या आधाराने तीन हजारांवर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. आजही आम्हाला कोणीही एक भूलतज्ञ दिल्यास आम्ही शस्त्रक्रिया करण्याची आमची तयारी आहे. यावर डॉ. घोरपडे यांनी अस्पष्ठ उत्तरे देताच शिष्ठमंडळाने डॉ. मोरे यांना चांगलेच धारेवर धरले. 

अवधूत सोळाखे, दत्ता टिपूगडे, शिवाजी जाधव, मंजीत माने, सुनिल पवार आदींचा याशिष्ठमंडळात समावेश होता. 

डॉ. घोरपडेंच्या जबाबदारी टाळण्यावर आक्षेप 
डॉ. आरती घोरपडे तुम्ही एक तरी अधिष्ठातापद तरी संभाळावे किंवा त्या भूलतज्ञ आहेत तर त्यांनी भूलतज्ञांचे काम करावे. या दोन्ही जबाबदाऱ्या संभाळण्याचा आग्रह धरणार आणि रूग्णांचे हाल होणार असेल तर दोन्हीपैकी एक जबाबदारी संभाळा पण एकमेकांचे हेवदावे करीत हृदय शस्त्रक्रिया विभाग, खासगी समजून त्याला भूलतज्ञांची सेवा न देने हा अन्याय शिवसेना खपवून घेणार नाही. महिला म्हणून आम्ही तुमचा आदर करतो पण अधिकारी म्हणून तुम्ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसाल तर प्रसंगी मुख्यमंत्र्याकडे दाद मागू असा इशारा श्री पवार व श्री देवणे यांनी दिला. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT