Shivaji University  Sakal News
कोल्हापूर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला मिळेना कुलसचिव

१७ पैकी एकही पात्र नाही, पुन्हा होणार निवड प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी शनिवारी ता. ४ मुलाखती झाल्या. मुलाखत दिलेल्या १७ उमेदवारांपैकी एकही जण निवड समितीला पात्र वाटला नाही. विशेष म्हणजे यामध्ये विद्यापीठाचेच माजी कुलसचिव, माजी परीक्षा विभाग संचालक, प्रभारी कुलसचिव, उपकुलसचिव यांचा समावेश होता. त्यामुळे आता विद्यापीठाला पुन्हा एकदा नव्याने जाहिरात देऊन निवड प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचा कार्यकाळ १७ नोव्हेंबर २०२१ मध्ये संपला. त्यानंतर कुलसचिव पद रिक्त होते. गेले ८ महिने कुलसचिव पदासाठी निवडीची प्रक्रिया सुरू होती. डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती बनवण्यात आली. छाननी समितीने माजी कुलसचिव, माजी परीक्षा विभाग संचालक आणि विद्यमान उपकुलसचिव यांचेच अर्ज मुलाखतीसाठी अपात्र ठरवले. या सर्वांनी राज्यपालांकडे तक्रार केली. त्यानंतर कुलगुरूंनी त्यांना त्रुटींची पूर्तता करून मुलाखतीसाठी पात्र ठरवले. अशा प्रकारे आलेल्या अर्जांपैकी कुलसचिव पदासाठी २७ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले. शनिवारी निवड समितीसमोर १७ जणांच्या मुलाखतीही झाल्या.

मात्र, निवड समितीला यातील एकही उमेदवार कुलसचिव पदाला ‘सुटेबल’ वाटला नाही. यातील बहुतांशी उमेदवार अनुभवी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा अनुभव असणारे होते. विशेष म्हणजे विद्यापीठाचेच माजी कुलसचिव, माजी परीक्षा विभाग संचालक यांचाही यामध्ये अंतर्भाव होता; पण निवड समितीने कोणालाच पात्र ठरवले नाही. अखेर कुलसचिव पदासाठी पुन्हा जाहिरात देऊन निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आता किती कालावधी?

कुलसचिव हे विद्यापीठ प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पद आहे. गेले ८ महिने याचा कार्यभार प्रभारी सुरू आहे. आता नवीन कुलसचिव निवडीसाठी पुन्हा ८ महिने लागणार का? अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

परंपरा कायम

यापूर्वी विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या काळातही अशा प्रकारे कुलसचिव पदासाठी फेर निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. यंदाही पुन्हा निवड प्रक्रिया राबवून ही परंपरा कायम राहिली आहे.१७ पैकी एकही पात्र नाही, पुन्हा होणार निवड प्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT