Kolhapur Single Donor Platelets Group angels for patients
Kolhapur Single Donor Platelets Group angels for patients sakal
कोल्हापूर

थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन प्लेटलेट्स देणारे ‘देवदूत’

संदीप खांडेकर

कोल्हापूर : थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन अंतर्गत रक्तदाता कोल्हापूर सिंगल डोनर प्लेटलेट्स ग्रुपमधील सदस्य रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले आहेत. शहरातील अभिजित बुधले व उदय पवार यांनी सुमारे ६५ तर धनंजय पाडळकर यांनी ४७ वेळा गरजूंना प्लेटलेट्स दिले आहेत. राज्यभरात ग्रुपचे सदस्य असून, रुग्णांच्या मदतीला धावून जाण्याची तळमळ कौतुकाची ठरली आहे.

डेंगी व कर्करोगाच्या रुग्णाला प्लेटलेट्सची आवश्यकता भासल्यावर नातेवाईकांची पळापळ सुरू होते. दिवसा अथवा रात्री प्लेटलेट्स देणारा शोधायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. त्यावर पर्याय म्हणून थॅलेसेमिया निर्मूलन असोशिएशन अंतर्गत रक्तदाता कोल्हापूर सिंगल डोनर प्लेटलेट्स व्हॉट्स अप ग्रुप स्थापन झाला. त्यात निव्वळ प्लेटलेट्स दान करणारे ८५ सदस्य आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कराड, मुंबईसह जिल्ह्यात ग्रामीण भागातील सदस्यांचा यात समावेश आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सदस्य दिवसा अथवा रात्री केवळ एका कॉलवर रुग्णाच्या मदतीला धावून जात आहेत. ग्रुपमधील बुधले, पवार व पाडळकर यांनी प्लेटलेट्स जास्तीत जास्त वेळा दान केले आहेत. अन्य सदस्यांचा आकडाही दोन अंकी आहे.

असोसिएशन अंतर्गत नऊ व्हॉट्स अॅप ग्रुप असून, त्यात सुमारे ६०० सदस्य सहभागी आहेत. असोसिएशनमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्यांना यात स्थान दिले जाते. विशेष म्हणजे सदस्य कोणतीही अपेक्षा न ठेवता हे काम करत आहेत. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष अनिल व्हटकर म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात थॅलेसेमियाग्रस्त सुमारे साडेतीनशे बालकांना रक्ताची गरज लागते. त्याकरिता हा ग्रुप स्थापन झाला. पुढे प्लेटलेट्सची रुग्णांना असणारी गरज लक्षात घेऊन हा ग्रुप आकाराला आला. प्लेटलेट्स देण्याची प्रक्रिया दोन ते तीन तासांची आहे. मात्र, त्याचा विचार सदस्य न करता कार्यरत आहेत.

थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशनची स्थापना

जवाहरनगरात राहणारे जवान रोहित कृष्णदेव कदम यांच्या संकल्पनेतून २०१७-१८ला थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशनची स्थापना झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप काम करत आहे. श्री. कदम सध्या जम्मू काश्मीर येथे देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

Shubman Gill Post: रोहित शर्माशी खरंच बिनसलं? गिलने 'ती' पोस्ट करत चर्चा करणाऱ्यांची घेतली शाळा

Vitamin C : त्वचेसाठी फायदेशीर असणारे ‘व्हिटॅमिन सी’ सीरम घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT