Cyber crime sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : सोशल मीडियाच्या मोहजालात महिला, मुलीही

तुमचे वेगवेगळे फोटो- व्हिडिओ शेअर करण्यास तुम्हाला भाग पाडले जाते. सुरुवातीला हे मनोरंजन वाटते.

लुमाकांत नलावडे

कोल्हापूर : तुमचे वेगवेगळे फोटो- व्हिडिओ शेअर करण्यास तुम्हाला भाग पाडले जाते. सुरुवातीला हे मनोरंजन वाटते. मात्र, या मोहजालात तुम्ही कसे गुरफटता?, हे तुम्हाला कळत नाही. कालांतराने पुढे तुमचे अश्‍लील फोटो, व्हिडिओ केव्हा शेअर केले? हे सुद्धा कळत नाही. त्यातून तुम्हाला ब्लॅकमेलिंग केले जाते, तुमची फसवणूक होते. ग्रामीण भागातील एका पोलिस ठाण्यात नुकताच अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात काही महिला, मुली सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुलींनी सोशल मीडियाचे अकाउंट काढले. ‘इन्स्टंट’ फोटो शेअर करून ग्रुप वाढवत त्यातून मैत्री वाढवली. अशाच पद्धतीने संबंधित मुलींनी रोज फोटो-व्हिडिओ शेअर केले. मात्र, याच व्हिडिओ आणि फोटोंनी त्यांचा घात केला. ग्रुपमधील इतरांकडून त्यांचा गैरफायदा घेतला.

तुमचे सोशल मीडियावर बिनधास्त वागणे महागात पडते, हेच वागणे ब्लॅकमेलिंग करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. तुमचे सोशल मीडियावरील सर्व फ्रेंड्स हॅक करून त्यांच्यासमोर तुमची बदनामीची भीती दाखविली जाते. यातून तुम्हाला जे करायचे नाही, ते करण्यास भाग पाडले जाते. चुकीची कृत्ये करण्याची जबरदस्ती केली जाते. सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट वापरत असाल तर फसवणूक होऊ शकते. तुमचे फोटो-व्हिडिओ यांचा वापर करून खंडणी मागितली जाऊ शकते. यातून होणारी फसवणूक जीवावर बेतते.

वाढता सोशल मीडिया सायबर क्राईमसाठी पोषक ठरत आहे. अनेक जण याचे बळी ठरतात. सोशल मीडिया हाताळताना त्याचे पूर्ण ज्ञान घ्या. लॉग इन आणि लॉग आउट करा. पासवर्ड गोपनीय ठेवा. ओटीपी कोणालाही देऊ नका. फसवणूक झाली, तर सायबर सेलकडे तक्रार नोंदवा.

- शशिराज पाटोळे, पोलिस निरीक्षक, सायबर सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT