kolhapur sub jail 31 persons test corona cases positive in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर सबजेलमधील 31 बंदी पॉझिटिव्ह; प्रशासनाची ताराबंळ

राजेश मोरे

कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलमधील 31 बंदीना कोरोनाची बाधा झाली. तसे कारागृह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. संसर्ग रोखण्यासाठी संबधिताचे येथील केअर सेंटरमध्ये अलगीकरण करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. बिंदू चौक सबजेलमध्ये कच्चे बंदी ठेवण्यात येतात. गतवर्षी कोरोनाचा धोका विचारात घेऊन नव्याने दाखल होणारे कच्चे बंदी पहिल्यांदा आयटीआय येथील वसतीगृहातील तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात येत होते. येथे त्यांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तपासणीनंतर त्यांना बिंदू चौक सबजेलमध्ये हलविण्यात येत होते.

सध्या ही प्रक्रिया बंद झाली. राज्यासह देशात पुन्हा कोरोनाच्या संकटाने डोकेवर काढले. कोरोना साखळी तोडण्यासाठी शासानाने वीकेंड लॉकडाऊनही लागू केला आहे. दरम्यान, कारागृहातील एका बंदीस इचलकरंजी येथे तपासकामासाठी नेण्यात आले होते. तो बंदी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह अढळला. त्यानंतर दक्षतेचा भाग म्हणून बिंदू चौक कारागृह प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या 82 बंदीची गुरूवारी (8) सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे चाचणी करण्यात आली.

यात तब्बल 31 बंदीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसे प्रशासन खडबडून जागे झाले. संबधितांचे सावित्रीबाई फुले व सीपीआर रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तातडीने अलगीकरण करण्यात आले. तसेच त्यांच्यावर औषध उपचार सुरू करण्यात आले. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने कारागृहात आवश्‍यक त्या उपाययोजनाही तातडीने करण्यास सुरवात केली आहे. 

 
दृष्टीक्षेपात -

  • पुरूष बंदी - 199 
  • महिला बंदी - 10 
  • कर्मचारी - 30 

"सबजेलमधील 31 बंदी कोरोना पॉझीटीव्ह अढळले आहेत. त्यांची प्रकृती स्थीर असून आवश्‍यक त्या सर्व उपायोजना करण्यात आल्या आहेत. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार इतर बंदीचींही तपासणी करण्यात येईल."

- विवेक झेंडे (अधीक्षक, बिंदू चौक सबजेल) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT