CPR hospital sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : सुपरस्पेशालिटी दर्जाची CPR ला प्रतीक्षा

वैद्यकीय शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची गरज

शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: नियमित आजारांवरील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय रुग्णांसाठी आधार ठरत आहे. मात्र, गंभीर आजारावरील उपचार व सेवा सुविधांची कमतरता आहे. परिणामी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन जनआरोग्य योजनेचा लाभ घेत मोफत उपचार करून घेतात. त्यातून खासगी रुग्णालयाला वर्षाकाठी जवळपास ४० कोटींचा अर्थिक लाभ होतो. त्याच धर्तीवर सीपीआरमध्येही जनआरोग्य योजनेत कर्करोगासारख्या गंभीर दुर्धर आजारांची उपचार सेवा सुरू झाल्यास काही कोटींचा लाभ सीपीआरला होऊ शकतो. त्यातून सर्वसामान्यासाठी रुग्ण सेवा अधिक प्रभावी होऊ शकेल. त्यासाठी सीपीआरला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जाच्या सेवा सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मनावर घेऊन येथील उपचार सेवेतील कमतरता दूर करणे आवश्यक आहे.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा आदी भागातील रुग्ण उपचारासाठी कोल्हापुरात येतात. यातही सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभाग, प्रसूती विभागात सर्वाधिक रुग्ण येतात तसेच अपघातातील सर्वच जखमीही सीपीआरला येतात, त्यांच्यावर तातडीने उपचार होतात. मात्र, डोक्याला मार बसला असेल, मणक्याची दुखपात अथवा झिज झाली असेल किंवा अन्य काही कारणाने एमआरआय काढावा लागतो. मात्र ही सुविधा सीपीआरमध्ये नाही. त्यामुळे जखमीला खासगी रूग्णालयात नेऊन एमआरआय काढावा लागतो. ही अडचण विचारात घेता सीपीआरला तातडीने एमआरआय मशिन नव्याने बसवावे लागेल.

रोज दोनशे ते चारशे रुग्ण पहिल्यांदा अपघात विभागात येतात. त्यांच्यासाठी दोनशे कक्ष उपचारासाठी आहेत. नवा कक्ष स्थापन केला. मात्र, तो कोरोनासाठी राखीव झाला. त्यानंतर जुन्याच अपघात विभागात सद्या उपचार सेवा दिली जाते. हा कक्षही पुन्हा अद्यायावत करावा लागेल.

सीपीआरमध्ये रक्तपेढीची सुविधा आहे. येथे नियमित आजारातील रक्तांच्या चाचण्या होतात; पण बहुतांशी महत्त्‍वाच्‍या चाचण्या बाहेरच्या खासगी रक्तपेढीकडून करून घ्याव्या लागत आहेत, तर काही खासगी लॅबचे प्रतिनिधी सीपीआरच्या रुग्णांचे रक्ताचे नमुणे घेऊन चाचणी अहवाल देतात. ही पद्धत धोकादायक ठरू शकते. त्यासाठी रक्ताच्या सर्व तपासण्या सीपीआरमध्ये व्हाव्यात अशी सोय करावी लागेल.

कर्करोगासाठी स्वतंत्र उपचार कक्ष हवा

कर्करोगीचे प्रमाण वाढते प्रमाण विचारत घेऊन सीपीआरमध्येच कर्करोग निदान व उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा लागेल. कर्करोगावर प्रभावी उपचार सेवा सीपीआरमध्ये नसल्याने बाहेर खासगी रुग्णालयात जातात. तेथे जनआरोग्य योजनेतून उपचार करून घेतात. जनआरोग्य योजनेची बिलांची वर्षाकाठी २० कोटींची रक्कम खासगी रुग्णालयाला जाते. हीच योजना सीपीआरमध्येही आहे. त्यामुळे कर्करोगाची प्रभावी उपचार कक्ष सीपीआरमध्ये सुरू झाल्यास तसेच चाचण्याची सुविधा सुरू झाल्यास योजनेतून रुग्णांवर मोफत उपचार होतील. त्यातून सीपीआरला कोट्यवधीची बिले योजनेतून मिळतील. त्यातून सीपीआरच्या उपचार सुविधा अधिक सक्षम करण्यास हातभार लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT