सुधारित पूररेषेला मुहूर्ताची प्रतीक्षा sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : सुधारित पूररेषेला मुहूर्ताची प्रतीक्षा

फेब्रुवारीमध्ये सर्व्हे; मुख्य अभियंत्यांची हवी मान्यता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: नव्याने सर्व्हे झालेल्या सुमारे ४० किलोमीटरच्या निळ्या आणि लाल पूररेषेवर शिक्कामोर्तब होण्यास दिरंगाई होत आहे. फेब्रुवारीमध्ये याबाबतचा निर्णय होऊन जलसंपदा विभागातून सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे; मात्र मुख्य अभियंत्यांची स्वाक्षरी न झाल्यामुळे काम रेंगाळल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येते. जूनमध्ये नवीन पूररेषा निश्‍चित केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे जिकिरीचे ठरते. सुमारे अडीच महिन्यांनंतरही पूररेषा कोणाच्या सांगण्यावरून अद्याप प्रसिद्ध झाली नाही, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

पाऊस सुरू झाला की पूररेषेवर चर्चा होते आणि पाऊस गेला की दुर्लक्ष होते. नदीकाठच्या भागात झालेल्या बांधकामाचा फटका महापुरात सर्वसामान्यांना बसतो. यावेळी निळ्या आणि लाल रेषेचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येतो. ही रेषा निश्‍चित होत नाही, तोपर्यंत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढतात आणि एकदा झालेली बांधकामे पुन्हा काढणे सहजासहजी शक्य होत नाही. यानंतर मात्र त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे काम सुरू होते.

फेब्रुवारीत वरिष्ठ कार्यालयाला सर्व्हे सादर केला आहे. प्रत्यक्षात तातडीने मुख्य अभियंत्यांची स्वाक्षरी होऊन मार्चमध्येच नवी पूररेषा प्रसिद्ध होणे अपेक्षित होते; मात्र मे उजाडला तरीही ती अद्याप गुलदस्त्याच आहे. पंधरा दिवसांत पूररेषेवर शिक्कामोर्तब होईल, अशी स्थिती असताना ही रेषा अद्याप का निश्‍चित झाली नाही, असा सवाल आहे.

पूररेषा निश्‍चित झाल्यावर नदी काठावर होणाऱ्या बांधकामांना चाप बसू शकतो. पूररेषेमुळे नदी काठच्या कोणत्या ठिकाणापर्यंत बांधकाम करता येणार नाही, हे निश्‍चित होईल. बांधकामावेळी उपाययोजना कोणत्या, काय खबरदारी घ्यावी लागेल, यावर शिक्कामोर्तब होईल;

मात्र हीच पूररेषा जूनमध्ये निश्‍चित झाली तर पावसामुळे त्याची अंमलबजावणी तातडीने करणे तितके सोपे राहणार नाही. यातून पुन्हा दिरंगाई होऊ शकते.

पाठपुराव्यानंतरही

बांधकाम व्यावसायिकांनी आणि जिल्हा प्रशासनानेही याबाबत पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात येते. साधारण बालिंगा पाडळी खुर्द ते रुकडीपर्यंत नव्याने सुमारे ४० किलोमीटरची ही पूररेषा होणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येते. विशेष म्हणजे प्राधिकरणातील गावे, शहर आणि हातकणंगले तालुक्यातही काही गावांचा यामध्ये समावेश असल्यामुळे या पूररेषेला अधिक महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT