Suicide टिम ई सकाळ
कोल्हापूर

Kolhapur : तनवडीच्या जवानाची गळफासाने आत्महत्या

कारण अस्पष्ट; पंधरा दिवसांपूर्वी आले होते सुटीवर

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानंद मलाप्पा आरबोळे (वय २३) असे मृत जवानाचे नाव आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवानंद गेल्या चार वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. पुणे येथे १०९ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये ते भरती झाले होते. सध्या त्यांची नियुक्ती कोटा (राजस्थान) येथे होती. शिवानंद अविवाहित होते. यंदा त्यांचे लग्न करण्याचे नियोजन होते. त्यामुळे मुलींचे स्थळ पाहण्यासाठी ते १५ दिवसांपूर्वी गावी सुटीवर आले होते. शिवानंद यांचे मोठे भाऊही सैन्य दलात कार्यरत आहेत. तेही सुटीवर आले आहेत.

दरम्यान, शिवानंद, त्यांचे भाऊ व आई-वडील आज सकाळी शेताकडे गेले होते. शेतातील काम केले. सर्वांनी एकत्र बसून शेतातच जेवणही केले. त्यानंतर शिवानंद अंघोळ करायची आहे असे सांगून दुपारी बाराच्या सुमारास घरी आले. घरात आल्यानंतर त्यांनी लोखंडी अँगलला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतला.

शेतातील काम आवरून आई-वडील व भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शिवानंद यांना उपचारासाठी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे परिसरात २४ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबलची चोरी

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT