कोल्हापूर

कोल्हापूर : समस्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचेच आव्हान

महापालिका पन्नाशीत; उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ लागणे कठीण

डॅनियल काळे

कोल्हापूर, ता १४ ः कोल्हापूर महापालिकेचा आज ४९ वा वर्धापन दिन आहे. पन्नाशीत प्रवास करताना महापालिकेसमोर आव्हानांचा डोंगर आहे. आर्थिक संकटासह महापालिका विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडली आहे. या चक्रव्यूहातून महापालिकेला बाहेर काढणे हेच मोठे आव्हान आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताऴमळ लागणे कठीण आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ५० व्या वर्षात पदार्पण करताना तरी महापालिकेची हद्दवाढ होईल का, असा प्रश्न नागरिकांना

पडला आहे.

कोल्हापूर पालिकेचे कोल्हापूर महापालिकेत १९७२ मध्ये रूपांतर झाले. पालिकेचा फलक गेला आणि महापालिका असा फलक झाला इतकाच काय तो फरक पडला. ५० वर्षांत हा फरक दूर करणेही येथील लोकप्रतिनिधींना शक्य झाले नाही. मुळातच शहराचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींची मानसिकता हद्दवाढीच्या बाजूची नाही हे जळजळीत वास्तव आहे. महापालिका ५० व्या वर्षात पदार्पण करताना पुन्हा एकदा हद्द वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र, या बाबतीत लोकप्रतिनिधींनी अंतिम निर्णय घ्यायला हवा. मध्यंतरी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनंतर मुंबईत बैठक घेऊन असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे ही बैठक प्रलंबित होती. आता पुन्हा या बैठकीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

...तर विकासकामांची काय अवस्था?

आर्थिक समस्येचा सामना महापालिकेला करावा लागत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन सध्या वेळेत होत नाही. वेतनासाठी शासन अनुदानावर अवलंबून बसण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. वेतनाला पैसे नाही तर विकासकामांची काय अवस्था असेल याची कल्पना

यावरून येते.

सेवांवर परिणाम

महापालिका ही सेवा देणारी यंत्रणा आहे. वाढलेल्या आर्थिक समस्यांचा परिणाम महापालिका देत असलेल्या सेवांवर होत आहे. महापालिकेची वर्कशॉप्स यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे शहरातील सर्वच सोयीसुविधांवर त्याचा परिणाम होतो. मात्र वर्कशॉपकडे वाहनांच्या स्पेअर पार्टसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक वाहने मोडकळीस आली आहेत. परिणामी महापालिकेच्या सेवा हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT