In Kolhapur, there is no mask, no access, no goods, the campaign will be carried out 
कोल्हापूर

कोल्हापुरात मास्क नाही, प्रवेश नाही, वस्तूही नाही, मोहिम राबवणार

डॅनिअल काळे

कोल्हापूर  : दिवाळीच्या पार्श्वभूमिवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नो मास्क नो एन्ट्री ही मोहिम शहरात कठोरपणे राबवू, अशी ग्वाही चेंबर ऑफ कॉमर्ससह शहरातील सर्व व्यापारी असोसिएशन व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनास दिली. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत चेंबर ऑफ कॉमर्स तसेच शहरातील विविध व्यापारी संघटनाची बैठक उपायुक्त निखिल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, शहरातील सर्व व्यापारी मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही,' याबाबत कठोरपणे भूमिका घेतील. दुकानात गर्दी होणार नाही, यासाठी दुकानाबाहेर एक स्वतंत्र कामगार ठेवून मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करण्याची खबरदारी घेतील.'' 
उपायुक्त निखील मोरे म्हणाले, "" मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही ही भूमिका व्यापारी बंधूनी घ्यावी. प्रमुख बाजारपेठाच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी नागरीकांनी खरेदीसाठी शक्‍यतो दिवसा बाहेर पडावे.'' 
इस्टेट ऑफिसर सचिन जाधव म्हणाले, "" कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असून याबाबत महापालिका प्रशासनाने पाच पथके आणि केएमटीची स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. दिवाळीच्या काळात गाडी अड्डा येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे.' 
नगरसेवक किरण नकाते, चेंबर ऑफ कॉमर्सचे वैभव सावर्डेकर, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, जयंत गोयानी, प्रशांत शिंदे, अजित कोठारे, संदीप वीर, बबन महाजन, अनिल धडाम, संभाजी पोवार वाहतूक निरिक्षक सुनिल जाधव, बशीर मकानदार, राजेंद्र पाटील उपस्थित होते. 
संपादन - यशवंत केसकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT