kolhapur tourism information by shivaji yadav 
कोल्हापूर

अंबाबाई मंदिरासह प्रेक्षणीय स्थळे गेली गजबजून

शिवाजी यादव

कोल्हापूर :  कोरोना संसर्ग टाळण्यासाठी  लॅाकडाऊन काळात घरी बसून कंटाळलेला बहुतांशी वर्ग सुट्ट्यांचा मुहूर्त साधून पर्यटनाला निघालेला आहे. परिणामी परराज्यातून पर जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कोल्हापूर अंबाबाई मंदिरासह प्रेक्षणीय स्थळे गजबजून गेली आहेत. पर्यटन, व्यवसायिक उलाढालीला यामुळे निश्चित बळ लाभले आहे.गेल्या महिन्याभरापासून अनेकांनी पर्यटन करण्याचे नियोजन केले आहे. आज नाताळाची सुट्टी. उद्या शनिवार, रविवारची सुट्टी, सोमवारी औद्योगिक क्षेत्राला असलेली सुट्टी व रजा यांचा लाभ घेत दीर्घ पर्यटनाचे बेत आखले गेले.


पुण्या-मुंबई याचबरोबर अन्य जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबीय पर्यटनावर निघाले आहेत. बहुतेक जण खाजगी चार चाकी गाडी घेऊन पर्यटनावर निघाले आहेत त्यामुळे शहरात येणाऱ्या चारही मार्गावर रात्रभर प्रवास करून शहरात येणाऱ्यांच्या गाड्यांची गर्दी झाली. तसेच शहरातील यात्रीनिवास हॉटेल लाॅज जवळपास हाऊसफुल झाले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंबाबाई मंदिर परिसर तुळजाभवानी मंदिर परिसर, रंकाळा न्यू पॅलेस अशा प्रेक्षणीय स्थळावर गर्दी झाली. दर्शना नंतर अनेकांनी कोल्हापुरी खास पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिक हॉटेलमध्ये गर्दी केली.

कोल्हापुरी मिसळ, वडापाव यापासून ते खास दक्षिणेतील पदार्थांचाही चव चाखली. बहुतेकजण दुपारचे जेवण विशेषता तांबडा पांढरा रस्सा याचा आस्वाद घेऊन पन्हाळा गड किंवा स्थानिक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी निघाले आहेत. काहींनी आज कोल्हापुरातच मुक्काम करून पुढे उद्या कोकण गोव्याच्या दौऱ्यावर जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आज दिवसभर शहरातील विविध रस्त्यांवर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी ठळकपणे दिसून येत होती. त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठी गुळ खरेदी साठी सुद्धा अनेकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली.


 ग्रामीण भागातून विशेषता मराठवाड्यातून आलेल्या वर्गाने येथे कपडे खरेदीला ही प्राधान्य दिले आहे. लग्नसराईचा काळ सुरू होत असल्याने तीच संधी साधून काही ग्रामीण कुटुंबीयांनी कोल्हापुरातील आलीशान कापड दुकानांमध्ये बसता घेण्यासाठी सुद्धा गर्दी केली. त्यामुळे आज शहरातील बाजारपेठा, प्रेक्षणीय स्थळे तसेच उद्याने या परिसरातील अवतीभोवतीच्या छोट्या-मोठ्या व्यवसायिक घटकांचा व्यवसाय साधला गेला.

बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापुरात जसे पर्यटक मोठ्या संख्येने आले त्याचप्रमाणे कोल्हापूरातून ही गोवा, कोकण तसेच महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणी अनेक जण पर्यटनाला गेले आहेत. अनेकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टचे बुकिंग गेल्या महिन्यातच केले होते तर काहीजण खाजगी फार्महाऊसवर राहण्यासाठी गेले आहेत.


समाजातील सर्वच घटकांना सुरक्षित व किफायतशीर भाड्यात  दिर्घ प्रवास घडवून आणणार्‍या एसटी महामंडळाच्या गाड्यांना ही आज गर्दी होती. यात नरसिंह वाडी, ज्योतिबा, पन्हाळा, मारलेश्वर, गगनबावडा आजरा या गाड्यांना गर्दी असल्याची माहिती एसटीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली .आवडेल तेथे प्रवास योजनेचा पास काढून आपल्या कुटुंबीयांना घेऊन एसटीनेच पर्यटनावर निघालेले आहेत. सध्या रेल्वेचा प्रवास मर्यादित सुरू असल्याने अनेक जण एसटीचा आधार घेऊन प्रवास करीत आहेत त्यामुळे एसटीच्या प्रवासी महसुलात काही अंशी वाढ झाल्याची माहिती एसटीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

 संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT