kolhapur tourism MTDC Resort House Full information by shivaji yadav 
कोल्हापूर

थंड हवेच्या ठिकाणांसह, समुद्र किनारे गजबजले

शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी दीर्घकाळ लागलेल्या लॉकडाउन काळात घरी बसून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहे. परिणामी पर्यटनाला पुन्हा वेग आला आहे, अशा स्थितीत विदेशी पर्यटन अद्याप थांबलेलेच असल्याने थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे व गट गडकोट किल्ल्यांना पर्यटकांनी प्राधान्य दिले आहे. 
अशात एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक फुल्ल झाली आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्याचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात तरी पर्यटनस्थळे गर्दीने गजबजून जाणार आहेत.


कोरोनासंसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन सुरू होता. यात पहिल्याच टप्प्यात विदेशी पर्यटन बंद झाले. यात कोल्हापूर परिसरातील जवळपास दोन हजारांहून अधिक पर्यटकांची ५० कोटी  रुपयांची गुंतवणूक अडकून पडली आहे. यात दुबई, थायलंड, मलेशिया, मॉरेशनपासून ते जर्मनीपर्यंत अनेक ठिकाणी पर्यटनाला जाण्यासाठी बुकिंग केले होते. मात्र कोरना लॉकडाउन काळात विमान सेवा बंद झाल्याने पैसे पर्यटकांचे अडकून पडले होते. यातील बहुतांशी विदेशी विमान सेवा सुरू झाल्यानंतर विदेशी पर्यटनाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. 


सहा महिने घरीच बसलेला हा पर्यटकांचा वर्ग सध्‍या राज्यांर्तंगत पर्यटनास निघाला आहे. अशी पुणे, मुंबई, कर्नाटक, आंध्र, गुजरात मधील बहुतांशी पर्यटक सद्या महाराष्ट्रात यातही कोकण किनार पट्टी,  महाबळेश्‍वर तसेच गोवा पर्यटना निघाले आहेत. यापैकी अनेकांनी कोल्हापुरात हॉटेल बुकिंग केले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमटीडीसीचे रिसॉर्ट ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बुकिंग झाले आहे. यात डोंगर दऱ्या, जंगल, सुमद्र किनारे, थंड हवेची ठिकाणे येथे बुकींग झाले आहे. यात तारकर्ली, गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्‍वरसह राज्यातील १८ रिसार्टचा समावेश आहे. 

देशांर्तगत पर्यटकांची मोठ्या संख्येने वर्दळ पूर्ववत सुरू झाली आहे. एमटीडीसीची रिसॉर्ट बुकिंग ९० टक्के आहे. पुढील दोन महिन्यातील सुटीच्या तारखांना चौकशी व बुकिंग होत आहे. प्रत्येक रिसॉर्टमध्ये स्थानीक खाद्य पदार्थांचा समावेश करून त्याच प्रकारच्या शाकाहारी, मांसाहारी जेवणाची सोय केली आहे. त्यामुळे अस्सल मराठमोळ्या पदार्थांचा अास्वाद रिसॉर्ट व रेस्टॉरंटमध्ये घेता येणार आहे.
- दीपक हार्णे, पुणे विभागीय व्यवस्थापक (एमटीडीसी)

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT