tourist places  esakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पर्यटकांमुळे शहर हाउसफुल्ल

वाहतुकीची कोंडी, पार्किंग भरले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सलग सुट्या आल्याने शहरात दोन दिवसांपासून पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रविवारी दुपारीच शहरातील सर्व पार्किंग वाहनांनी भरून गेली. त्यामुळे भाऊसिंगजी रोड, राजाराम रोड, बिंदू चौक येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाजारपेठांमध्ये पर्यटकांची रेलचेल होती. अंबाबाईची दर्शनरांगही मंदिराबाहेर आली होती. शहराकडे येणाऱ्या मार्गावरही वाहतूक मंदगतीने सुरू होती.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरामध्ये भाविक आणि पर्यटकांचे येण्याचे प्रमाण वाढते आहे. शनिवार, रविवारची सुटी आणि त्याला जोडून आलेली सोमवारची बुद्धपौर्णिमेची सुटी यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात पर्यटकांची गर्दी झाली. सकाळपासूनच शहरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी ३ वाजेपर्यंत बिंदू चौक पार्किंग भरले. त्यानंतर प्रायव्हेट हायस्कूल आणि दसरा चौक मैदानात वाहने उभी करण्यात आली. येथेही पार्किंगदेखील भरल्याने अखेर मिळेल त्या जागी पर्यटकांनी गाड्या लावल्या. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. भाऊसिंगजी रोड, राजाराम रोड, बिंदू चौक, ताराबाई रोड या सर्व ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापुरात येणारे पर्यटक देवी दर्शन घेतल्यानंतर पन्हाळा, जोतिबा येथे पर्यटकांनी जाणे पसंत केले. त्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाहनांची वर्दळ होती.

गगनबावडामार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांमुळे रंकाळा टॉवर, फुलेवाडी, कळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. राधानगरी रोडवरही वाहनांची गर्दी दिसून आली. शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड या मुख्य बाजारपेठांमध्ये पर्यटक फिरताना दिसत होते. हॉटेल, रेस्टॉरंट येथेही पर्यटकांची वर्दळ होती.

यात्री निवासांचा त्रास नागरिकांना

शहरात आलेले पर्यटक देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या यात्री निवासात पर्यटक राहातात. त्यामुळे यात्री निवास मालकांचा व्यवसाय होतो. आसपासच्या हॉटेल, रेस्टॉरंटवाल्यांनाही व्यवसाय मिळतो. मात्र, पर्यटकांची वाहने परिसरातील गल्ली बोळात अस्ताव्यस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही. तसेच या भागात वाहतुकीची कोंडी होते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT