truck
truck sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : खर्चाच्या बोजात वाहतूकदार तोट्यात

शिवाजी यादव

कोल्हापूर: माल वाहतुकीच्या गाड्यांची वाढती संख्या, यामुळे सर्वांनाच माल वाहतुकीचे भाडे मिळत नाही, एक, दोन भाडे मिळाले, की गाडी रुटवर निघते. वाटेत शासकीय यंत्रणांकडून सापळे लावले जातात. क्षुल्लक कारणावरून होणारी ‘वसुली’ किंवा दंडाच्या खर्चाचा भुर्दंड वाढतो. कधी कधी कारवाईत नाहक ट्रकचालकाला फसावे लागते. असे ट्रक कारवाईतून सोडवून आणणे जिकिरीचे बनते. लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते. अशा वाढत्या खर्चाच्या बोजामुळे मालवाहतूकदार मेटाकुटीस आले आहेत.

जिल्ह्यातून चिरा, वाळू, ऊस तसेच ट्रक घरगुती किंवा व्यावसायिक साहित्याची ने-आण करणारे ट्रक, टेंपो याची अनेकदा अडवणूक केली जाते.

गाडी भरली, रस्त्यावरून निघाली की, अवघ्या २० ते ५० किलोमीटरमध्ये वाहतूक पोलिस, परिवहन विभागाचे भरारी पथक तर कधी चेक पोस्टवर हमखास गाडी अडवली जाते. प्रत्येक ठिकाणी २०० ते ५०० प्रमाणे ‘लाभ’ द्यावा लागतो. नियम पाळले असले तरी कुठे तरी नियम काढून त्याचे उल्लंघन झाल्याचे दाखवले जाते. सहा महिन्यांपूर्वी दंडाच्या रकमेत वाढ झाली. ओव्हरलोड ४० हजार दंड झाला. परमिट नूतनीकरण नसल्याने दहा हजार, दुसऱ्याची गाडी वापरली म्हणून दहा हजार रुपये दंड अशी रकमेत वाढ झाली आहे. एखाद्या कारवाईत गाडी सापडली तरी जुनी गाडी असल्यास मालक दंड भरून गाडी विकण्याच्या मन:स्थितीत येतो.

आराम बसला कॅरेजची सुविधा द्या

आराम बसमधूनही माल वाहतूक होते. कोल्हापुरातून मासे, भाजीपाला, अलंकार, कुरियर, पार्सल अशा मालाची वाहतूक होते. सध्या डिगीचा वापर केला जातो. पूर्वी आरामबसच्या टपवर कॅरेज होते; मात्र कॅरेजला बंदी आली. सध्या डिगीचा वापर करून माल वाहतूक होते. मात्र, अनेकदा गाडीत प्रवासी जास्त नसतात, अशावेळी आरामबस मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. अशा वेळी मालवाहतुकीचा थोडा आधार असतो. शासनाने विचार करून कॅरेजवरून माल वाहतूक करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आरामबस वाहतूकदारांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT