प्रधानमंत्री जनआरोग्य योजना sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : दोन लाख व्यक्तींना २५ कोटींच्या उपचारांचा लाभ

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना: तीन वर्षांत ११२२ आजारांवर मोफत सुविधा

शिवाजी यादव

कोल्हापूर: उपचारापेक्षा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बिल किती होईल?, याची भीती वाटते. सरकारी दवाखान्यात उपचार करावेत की?, खासगीत करावेत? असा प्रश्न निर्माण होतो. अशांना उपचार खर्चाचा भार उचलत बिनधास्तपणे उपचार घेण्याची सुविधा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेने दिली. जिल्ह्यात तीन वर्षांत २ लाख लोकांनी २५ कोटींच्या खर्चाचे उपचार घेतले आहेत.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना सुरू होऊन गुरुवार (ता. २३) सप्टेंबरला तीन वर्षे पूर्ण होतात. राज्य शासनातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजना चालवली जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय आहे, तेथेच प्रधानमंत्री आरोग्य योजनेचेही काम चालते. जनगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंबांच्या नोंदी घेतल्या.

यात घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबे, तर कचरा वेचक व्यक्ती, फिरस्ते, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागिर अशा ११ वर्गांतील कुटुंबे यांच्यासह एकूण ८३ लाख कुटुंबांचा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समावेश केला आहे. या वर्गातील व्यक्तींना दीड लाखांपासून ५ लाखांपर्यंतच्या उपचार खर्चाची सेवा राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून दिली जाते. त्यासाठी ११२२ आजारांवरील उपचार घेता येतात.

जिल्ह्यातील ५२ रुग्णालयांत सेवा

जिल्ह्यातील एकूण ५२ रुग्णालयांत सेवा आहे. यात १२ शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णांनी योजनेसाठी योग्य ती कागदपत्रे सादर केल्यानंतर रुग्ण दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंतचा खर्च केला गेला. ज्या रुग्णालयात उपचार झाले. त्याचे बिल संबंधित रुग्णालयाला योजनेद्वारे आदा केले. ज्यांच्याकडे पिवळे, अंत्योदय, केसरी, रेशन कार्ड आहे, अशांना त्याचा लाभ घेता येतो.

"प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ गरजूपर्यंत पोहचविण्यात यश आले आहे. २०१८ पासून आजवर २ लाख ४ हजार ३४८ व्यक्तींनी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात ७ लाख २६ हजार कुटुंबांचा समावेश आहे. त्यापैकी २ लाख १८ हजार ९६७ व्यक्तींनी ई कार्ड काढली आहेत. अशांना त्याचा लाभ घेता येतो."- डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक जनआरोग्य योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Missing Youth : दुबईहून दिल्लीला निघालेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्ता; कुटुंबीयांची पोलिसांकडे धाव,शोध सुरू

Nashik Pune Highway: ‘राष्ट्रवादी’चे अनोखे आंदोलन! सिन्नर-खेड महामार्गाच्या प्रलंबित कामांवरून आक्रमक; चितेवर बसून दोघांचे उपोषण

IND vs SL: भारताचा दणदणीत विजय WTC मध्येही फायदा; पण तरी फायनलं आव्हान अजूनही कठीणच; पाहा समीकरण

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या लढ्यात कोणता नवा पेच निर्माण झाला? जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा निर्णय का?

Zepto चा ग्राहकांना धक्का! 149 चा गेम ओव्हर; Free Delivery साठी आता मोठी ऑर्डर करावी लागणार

SCROLL FOR NEXT