राडा
राडा sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : शहरात दोन ठिकाणी राडा'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : यादवनगरात टोळक्याने हातात नंग्या तलावरी घेऊन वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवली. तोडफोडीत १० ते १२ वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, रेसकोर्स नाका येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. सोमवारी (ता. ६) रात्री उशिरा घडलेल्या या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारांची नोंद जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.

यादवनगरातील प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले, की मद्यप्राशन केलेले एक टोळके मध्यरात्री यादवनगरात शिरले. त्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या. टोळक्याने शिवीगाळ करीत तलवारीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. या वेळी भयभीत झालेल्या महिलांनी आरडाओरड केली. त्याने परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. यानंतर हल्लेखोरांना रोखण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले, तसा हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र, हल्ल्यात दहा ते बारा वाहनांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नुकसान झालेल्या वाहनांचा पंचनामा केला. त्यानंतर हल्लेखोरांचा शोध सुरू केला. यासंबंधी मोहसीन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे (वय ३०, रा. यादवनगर), शाहरूख मुराद मोमीन (२८, रा. सुभाषनगर) आणि चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

रेसकोर्स नाका येथे काल (ता. ६) रात्री पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी दहा जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. बंडा चौगुले, सौरभ लोखंडे, विश्वजित चौगुले, गजानन गणाचार्य, सागर चौगुले, संजय आवळे, पृथ्वी आवळे, विलास आवळे, सरदार आवळे, निवास आवळे (सर्व रा. वारे वसाहत परिसर) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की खंडू अशोक माने (वय ४०) वारे वसाहत येथे राहतात. ते पेंटर आहेत. ते काल रात्री सव्वाअकराच्या सुमारास मित्र वैभव कुरणे यांच्याबरोबर रेसकोर्स नाका येथे गेले होते. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून संशयितांनी त्यांच्यावर एडका, चाकू, स्टीक आणि काठ्यांनी हल्ला केला. त्यात माने आणि कुरणे गंभीर जखमी झाले. याबाबत माने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

चप्पल आणि काचांचा सडा

घटनास्थळी तोडफोड करण्यात आलेल्या एका मोटारीजवळ तलवारीची मूठ व चप्पल पडले होते. तसेच, जागोजागी वाहनांच्या काचांचा ढीग पडलेला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT