UDID Card sakal
कोल्हापूर

Kolhapur : UDID कार्ड वाटप शिक्षकांच्या माथी

समाजकल्याणचे व्हाटस्‌अप आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त अनभिज्ञ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दिव्यांग व्यक्तींचे यूडीआयडी कार्ड वाटपाचे काम दिव्यांग शाळांतील शिक्षकांना दिले आहे. त्यामुळे राज्यभरातील दिव्यांग शाळा शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सहामाही परीक्षा काळात अध्यापनाचे काम सोडून दिव्यांग शाळा शिक्षकांनी यूडीआयडी कार्य वाटपासाठी गावभर फिरण्याची वेळ आली आहे, यातील विशेष असे की, दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केवळ व्हाटस्‌अप आदेशाद्वारे कार्ड वाटपाची सक्ती केली, असे आदेश पाळावेत कसे, असा प्रश्न शिक्षक विचारत आहे. याबाबत कास्‍ट्राईब दिव्यांग शिक्षक शिक्षकेतर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दिव्यांग व्यक्तींना यूडीआयडी कार्ड देण्यात येते. हे कार्ड बंगळूर येथील संस्थेत प्रिंट होऊन पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात येते. तेथून हे कार्ड पोस्टाद्वारे संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या घरी पोहचवले जाते, अशी कार्यपद्धती आहे, मात्र गेल्या आठवडाभरापासून राज्यातील बहुतेक समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दिव्यांग शाळा शिक्षकांना आदेश दिले. शिक्षकाने तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचे घर शोधून त्यांच्या घरी ही कार्ड द्यावीत, त्याचा फोटोही घ्यावा, असे लेखी पत्राद्वारे न देता व्हाटस्‌अप संदेशाद्वारे दिले.

याबाबत काही शिक्षकांनी दिव्यांग आयुक्त कार्यालय (पुणे) यांच्याकडे विचारणा केली, मात्र दिव्यांग आयुक्तांनी शिक्षकांनी कार्ड वाटावीत, असे आदेश दिलेले नाहीत, असे सांगितले. दिव्यांग शाळात सध्‍या सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू आहे. याच वेळी यूडीआयडी कार्ड वाटपाचे कारण सांगत शिक्षक अध्यापन सोडून शाळेतून दुपारीच बाहेर पडतात. त्यामुळे दिव्यांगांच्या अध्यापनाला फटका बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP protest: आणखी एका भाजप नेत्याच्या मुलीचा 'सीजेपी'ला पाठिंबा! सत्तापक्षाला घरचा आहेर, धर्मेंद्र प्रधानांची उडवली खिल्ली

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Latest Marathi News Live Update : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

SCROLL FOR NEXT