Money
Money Sakal
कोल्हापूर

Kolhapur : वडणगे ग्रामपंचायतीचा थकीत घरफाळा, पाणीपट्टीचा आकडा 3 कोटींवर

सुनील पाटील

वडणगे : येथील ग्रामपंचायतीकडील थकीत घरफाळा व पाणीपट्टीचा आकडा तब्बल तीन कोटींवर पोहोचला आहे.थकबाकीदारांच्या यादीत काही बडया धेड्यांचा समावेश आहे.कोटयवधी रूपयांची असलेली ही थकबाकी एखाद्या महानगरपालिकेच्या कारभाराला लाजवणारी आहे.थकबाकीचा आकडा कोटयवधींचा होईपर्यत ग्रामपंचायत गप्प का राहिली तसंच एरवी सर्वसामान्यांकडून वसुलीसाठी तत्पर असलेले ग्रामपंचायत प्रशासन या बडया धेंड्याकडील वसुलीसाठी आता तरी धाडस दाखवणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

येथे सुमारे साडेतीन हजार मिळकतधारक आहेत.या मिळकतधारकांकडे जवळपास 1 कोटी 89 लाख रूपयांची थकबाकी आहे.यातील 247 मिळकतधारकांकडेच 65 लाख रूपये घरफाळ्याची थकबाकी आहे. पाणीपट्टी थकबाकीचीही वेगळी स्थिती नाही. गावातील 3200 नळ कनेक्शनधारकांकडे तब्बल एक कोटी आठ लाख रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे.घरफाळा व पाणीपट्टी न भरणार्‍यांमध्ये बडया धेंड्याची संख्या अधिक आहे.247 मिळकतधारक असे आहेत की,ज्यांची घरफाळा थकबाकी दहा हजार ते एक लाख पर्यत आहे.एकीकडे सर्वसामान्य मिळकतधारक कारवाईच्या भीतीपोटी प्रामाणिकपणे कर भरतात.तर दुसरीकडे धनदांडगे कर भरताना कचरतात.आता अशा कर थकवणार्‍यांवर ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करणार का हाच खरा प्रश्‍न आहे

घरफाळा -पाणी पट्टीच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. कर्मचार्‍यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता वसुली करावी.प्रसंगी थकबाकीदारांचा पाणीपुुरवठा बंद करावा.ग्रामपंचायत त्यांच्या सोबत असेल मात्र वसुलीत गयगय केल्यास कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल. थकबाकीदारांनाही आपली थकबाकी भरून ग्रामपंचाायतीला सहकार्य करावे. वेळेत भरणा केला नाही तर थकबाकीदारांची नावे जाहीर करावी लागतील

-सचिन चौगले -सरपंच

महापुरावेळी पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर अनेकांनी सहाशे ते सातशे रूपये मोजून पिण्याच्या पाण्याचे टॅकर मागवले.मात्र वार्षिक बाराशे रूपये पाणीपट्टी भरताना मात्र अनेकांचे हात आखडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT