kolhapur White Army help to girl 
कोल्हापूर

...आणि 'त्या' तीसवर्षीय तरुणीच्या मदतीसाठी पोहोचली व्हाईट आर्मी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - येथील चित्रनगरी परिसरातील ओसाड माळरानावर तीन दिवस अन्न-पाण्यावाचून तळमळून बेशुद्ध पडलेल्या एका तीसवर्षीय तरुणीचे आज व्हाईट आर्मीच्या जवानांनी पुनर्वसन केले. तिच्यावर योग्य औषधोपचार करून शेठ रूईया विद्यालयात दाखल केले असून, ही तरुणी कुणाच्या ओळखीची असेल तर व्हाईट आर्मी किंवा सागर बगाडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या चंदन मिरजकर यांना या परिसरात एक तरूणी बेशुद्ध पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती सागर बगाडे यांना फोनवरून कळवली. श्री. बगाडे यांनी याबाबत तत्काळ व्हाईट आर्मीशी संपर्क साधला आणि त्यांच्यासह व्हाईट आर्मीची रेस्क्‍यू टीम चित्रनगरी परिसरात पोचली. 

दरम्यान, पोलीसही येथे आले आणि संबंधित तरूणीची सर्व स्वच्छता करून औषधोपचारही केले. 

 या तरुणीच्या अंगात जीन्स व टी शर्ट असून केस व्यवस्थित कट केलेले आहेत. सुशिक्षित वाटणाऱ्या या तरुणीवर कोणता तरी मानसिक आघात झाला असावा. तिच्या असंबद्ध बोलण्यावरून तिची काहीच माहिती मिळत नाही. मात्र, तरीही या तरूणीची जबाबदारी या सर्व मंडळींनी घेतली असून तिचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT