कोल्हापूर

गावागावांसह कोल्हापूरकरांचे दातृत्व...   स्मशानभूमीला 18 दिवसात साडेपाच लाखांवर शेणी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस अंत्यसंस्कारासाठी समाजातील विविध दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून 18 दिवसात साडेपाच लाखांहून अधिक शेणी मिळाल्या आहेत. यापुढील काळातही शहर आणि जिल्हयातील दानशूर आणि संस्थांनी स्मशानभूमीस मोठया प्रमाणात शेणीदान करुन सामाजिक कार्यास सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

 
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शहरी व ग्रामीण लोकावरही पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. मयत व्यक्तींची वाढलेली संख्या विचारात घेता नियोजनापेक्षा जास्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ स्मशानभूमीवर आली आहे. अंत्यसंस्कारासाठी मोठया प्रमाणावर शेणींची आवश्‍यकता भासत आहे. त्यामुळे महापौर व आयुक्तांनी पंचगंगा स्मशानभूमीसाठी समाजातील दानशूरांनी शेणीदान कराव्यात, असे आवाहन केले होते. या आवाहानास गावे, दानशूर व्यक्ति आणि संस्थांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला 

भविष्यात अंत्यसंस्कारासाठी अधिकाअधिक शेणींची आवश्‍यकता असून दानशुरांनी शेणी दान कराव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. विविध सेवाभावी संस्था, संघटना, तरुण मंडळे, तालीम मंडळे, गणेश मंडळे, क्रिडा व सांस्कृतिक मंडळे, ग्रामपंचायती, दुध संस्था, हायस्कूल, माहिला बचतगट, रोटरी क्‍लब, पत संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, विविध फौंडेशन आणि प्रतिष्ठान तसेच व्यापारी, उद्योजक, राजकीय पक्ष आणि संघटनांनी मोठया प्रमाणात शेणीदान करुन लोकसहभागाचा वाटा उचलला आहे. 
शेणीदान बरोबरच पंचगंगा स्मशानभूमीस समाजातील दानशूरांकडून स्प्रे पंप, रक्षा भरण्यासाठी सुंपल्या, टप तसेच मास्क, सॅनिटाईजर, हॅण्डग्लोज अधिक वस्तूही दान स्वरुपात उपलब्ध करुन दिल्याबद्दल महापौर आजरेकर व आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Accident Viral Video : आजोबा अन् २ नातवांना भरधाव 'थार'ने चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू; थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT