Kovid Center to be held at Bavda Pavilion; MLA Rituraj Patil 
कोल्हापूर

बावडा पॅव्हेलियनमध्ये  होणार कोविड सेंटर ; आमदार ऋतुराज पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा आणि लाईन परिसरातील आरोग्य व पूर परिस्थितीचा आढावा आज घेतला. कोरोना आणि पूर या संकटांचा सर्वजण काळजीपूर्वक सामना करूया, असे आमदार पाटील यांनी सांगितले. बावडा पॅव्हेलियन मैदानावरील हॉलमध्ये कोविड केअर सेंटर लवकर सुरू करण्याचा निर्णय त्यांनी सर्वांशी चर्चा करून घेतला. 
कोरोना आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कसबा बावडा येथील डॉक्‍टर, नगरसेवक व श्रीराम सोसायटीचे संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते, तरुण यांच्याबरोबर स्वतंत्र चार व्हिडिओ कॉन्फरन्स घेतल्या. यात त्यांनी प्रत्येकी दोन तास संवाद साधून या सर्वांची मते जाणून घेतली. 
या वेळी त्यांनी स्थानिक डॉक्‍टरांकडून रुग्ण तपासणी करताना घेतली जाणारी काळजी, डॉक्‍टरांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे, सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना होम क्वारंटाईन करणे, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ संकलित करून त्यावर कार्यवाही करणे, बावड्यातील सर्व नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणे याबाबत चर्चा केली. 
यात नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, डॉ. अजय शिंदे, डॉ. सुजीत पाटील, डॉ. स्वप्नील तहसीलदार, डॉ. स्वप्नील मगदूम, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. अतुल सपकाळ, डॉ. अनिल हेरलगे, डॉ. कसबेकर, डॉ. प्रवीण नेजदार यांनी मते मांडली. बावड्यात कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत अधिकाऱ्यांशी बोलून लवकर हे सेंटर सुरू करणार असल्याचे तसेच याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे नमूद केले. या वेळी नगरसेवक मोहन सालपे, अशोक जाधव, सुभाष बुचडे, माधुरी लाड, स्वाती यवलुजे, श्रावण फडतारे आदी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT