Kowade, Pedrewadi Farmers suffer Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

कोवाडे, पेद्रेवाडीत वनगाईचा धुमाकूळ

सुभाष पोवार

भादवण : कोवाडे व पेद्रेवाडी शिवारात वनगाईंनी धुमाकूळ घातला आहे. ऊस, उन्हाळी पिकांचे हा कळप नुकसान करीत आहे. त्यांच्या वावराने शेतकरी हैराण झाले असून वनविभागाने या गाईंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

पेद्रेवाडीतील चाळोबा डोंगर परिसरात हा कळप ठाण मांडून आहे. येथून तो रात्रीच्या वेळी शेतात उतरतो. शेतातील उभे पीक तो फस्त करीत चालला आहे. बाळकू पोवार, सदानंद पोवार, गणपती पोवार या कोवाडे येथील शेतकऱ्यांच्या ऊस पिकांचे कळपाकडून नुकसान झाले आहे. पेद्रेवाडी येथे रेडेकर, येजरे यांचेही नुकसान केले आहे.

यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने हिरण्यकेशी नदीमध्ये पाण्याचा साठा चांगला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी उन्हाळी पिकांच्याकडे वळला आहे. भुईमूग, मिरची व अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ही पिके कळपाने फस्त करण्यास सुरवात केली आहेत. शेतकऱ्यांनी वनगाईंना रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या पण कळप बधेनासा झाला आहे. वनविभागाने ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

हरपवडेत गव्यांकडून नुकसान 
हरपवडे परिसरातील पिकांचे गव्यांच्या कळपाने नुकसान सुरू केले आहे. गोविंद गुरव यांचे दीड एकरातील उस पिकाचे या कळपाने नुकसान केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT