Almatti Dam esakal
कोल्हापूर

Almatti Dam : 'आलमट्टीतून दोन लाख विसर्ग करा, अन्यथा या तीन जिल्ह्यांसमोर महापुराचं पुन्हा संकट उभं राहिलं'

सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे प्रशासन तसेच जलसंपदा विभाग आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठा कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल केल्याचे दिसत नाही.

कोल्हापूर : ‘सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. मात्र कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यातील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आलमट्टी धरणातून किमान दोन लाख क्यसेुक विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणावा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती (Krishna River Flood Control Action Committee) आणि आंदोलन अंकुश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, धनाजी चुडमुंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, कृष्णा खोऱ्यातील सर्व धरण क्षेत्रात तुफान पावसामुळे कृष्णा, पंचगंगा, कोयना, वारणा, तारळी नद्यांचे पाणी पातळी वेगाने वाढली आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे प्रशासन तसेच जलसंपदा विभाग आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीसाठा कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल केल्याचे दिसत नाही. आलमट्टीचे पाणी कमी केल्यानंतर कोल्हापुरातील पाणी पातळी कमी होण्यासाठी ७२ तासांचा अवधी लागतो. त्यामुळे महापुराच्या धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे पत्र मिळाले आहे. बैठक झालेली आहे. आलमट्टी धरण पाणी पातळीबाबत आम्ही नियमित पाठपुरावा करीत आहोत. आलमट्टीचा पाण्याचा विसर्ग नियमित व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT