Krishna River level esakal
कोल्हापूर

Krishna River : कृष्णेची पाणीपातळी 'इतक्या' फुटांनी वाढली; 33 बंधारे पाण्याखाली, अलमट्टीत किती साठा?

सध्या राजापूर बंधाऱ्या‍तून ६० हजार क्युसेक्सने पाणी कर्नाटकात सोडले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली. धरणक्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम होता.

जयसिंगपूर : धरण व पाणलोट क्षेत्रांसह सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा (Panchganga River), दूधगंगा या चार नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. विशेषत: एका रात्रीत कृष्णेची पातळी सात फुटांनी वाढल्याने शिरोळ तालुक्याला महापुराची धास्ती लागून राहिली आहे.

सध्या राजापूर बंधाऱ्या‍तून ६० हजार क्युसेक्सने पाणी कर्नाटकात सोडले जात आहे, तर हिप्परगीतून ५२१ मीटरने अलमट्टीकडे (Almatti Dam) आणि अलमट्टीत ९१.६६ टीएमसी पाणीसाठा होऊन ९ हजार ७३० क्युसेक्सने विसर्ग केला जात आहे. गेल्या आठ दिवसांत धरण व पाणलोट क्षेत्रांत चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोयना धरणात ४१.४० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

कृष्णा खोऱ्या‍ला जोडणाऱ्या‍ सर्व नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी राजापूर बंधाऱ्या‍वर सात फुटांने वाढून पाण्याची पातळी तीस फुटांवर गेली आहे. नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदीचा तर कोथळी-हरिपूर येथे वारणा नदीचा आणि कल्लोळ येथे दूधगंगा नदीचा संगम कृष्णेत होत असल्याने कर्नाटकात ६० हजार क्युसेक्सने पाणी जात आहे.

हिप्परगी (ता. जमखंडी) येथील बॅरेंज ५१ टक्के भरले असून, ५२१.५ मीटरने पाणी अलमट्टीकडे सोडले जात आहे. अलमट्टी धरणाची क्षमता १२३ टीएमसी असून, जुलै महिन्याच्या मध्यावरच ती ९२ टीएमसी धरण भरल्याने आता पश्चिम महाराष्ट्राला मोठी धास्ती लागून राहिली आहे. सध्या आलमट्टी धरणातून नऊ हजार ७३० क्युसेक्स पाणी सोडले जात अाहे.

इचलकरंजीत दुसऱ्यांदा घाट पाण्याखाली

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत २४ तासांत आठ फुटांनी वाढ झाली आहे. रविवारी सांयकाळी सहा वाजता ४६ फुटांवर असणारी पाण्याची पातळी आज सायंकाळी ५४ फुटांपर्यंत पोहोचली होती. आज दिवसभर पावसाने उघडीप दिली आहे; पण तरीही पाण्याच्या पातळीत अद्यापही वाढ होत आहे. मात्र, संथगतीने वाढ होत असल्याने तूर्त तरी पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. या हंगामात दुसऱ्यांदा घाट पाण्याखाली गेला आहे. सध्या जुन्या पुलालगत पाणी आले आहे; पण अद्याप वाहतूक बंद करण्यात आलेली नाही. मात्र, महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. आज रात्री पाण्याची पातळी स्थिर झाली तर पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार नाही.

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली. धरणक्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम होता. गेल्या २४ तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सुमारे ७ फुटांची वाढ झाली. जिल्ह्यातील ३३ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. २४ तासांत नदीची पाणीपातळी सुमारे सहा फुटांनी वाढली. रविवारी सकाळी २३ फुटांवर असणारी पाणीपातळी आज रात्री १० वाजता २९ फुटांपर्यंत वाढली.

पाण्याखालील बंधारे

शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, कुरणी, बस्तवडे व चिखली, साळगांव, दत्तवाड, येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कांटे, चिंचोली, माणगांव, कोडोली व खोची, सरकारी कोगे व हळदी, शेनवडे, मांडुकली व कळे असे एकूण ३३ बंधारे पाण्याखाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT