कोल्हापूर

"केएसबीपी' काही कामांची देखभाल करणार नाही 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : भाजपाचे सरकार असताना कोल्हापूर शहरात रस्ते सौंदर्यीकरणाची कामे केलेल्या कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प (केएसबीपी) या कंपनीने कोल्हापुरातील काही कामाची देखभाल यापुढे करणार नाही , तसे निवेदन महापालिकेला आयुक्तांना दिले आहे. 

या कामात येत असलेले राजकारण, केएसबीपीला विश्‍वासात न घेताच घुसखोरी करुन काही संस्थाकडून विशिष्ट रस्त्यांचेच सुरु असलेले सौंदर्यीकरण यामुळे "केएसबीपी'ने काही प्रकल्पच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, "केएसबीपी'ने शहर सौंदर्यीकरणासाठी राबविलेल्या प्रकल्पाला काही असामाजिक, राजकीय घटकांच्या स्वार्थाचे आणि उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. "केएसबीपी'ने उभा केलेल्या काही प्रकल्पात परस्परच व चुकीच्या पध्दतीने इतर काही संस्था काम करत आहेत. सध्या काही संस्था व मनपा विशिष्ट रस्त्यावरच केवळ सौदर्यीकरणाची कामे करत आहेत. "केएसबीपी'ला विश्‍वासात न घेता त्यांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी पुन्हा नवी कामे केली जात आहेत. यापुढे केएसबीपी पुढील कामे बंद करणार आहे. यात 15 हजार मीटर रस्त्यांच्या दुभाजकांमधील झाडांची देखभाल, सीबीएस चौक ट्रॅफीक आयलॅण्ड, ट्रेडसेंटर व आयलॅड, देवल क्‍लबजवळील आयलॅण्ड, जयंती नाला पूल आयलॅण्ड, मिरजकर तिकटी, सीपीआर चौकातील क्रांती उद्यान, उदयसिंह गायकवाड उद्यान ही कामे केएसबीपी बंद करणार आहे. यापुढे "केएसबीपी' निसार्गोपचार उद्यान, छत्रपती ताराराणी पुतळा परिसर, आईसाहेब महाराज पुतळा, कॉमन मॅन आणि पोलिस यांचे शिल्प, कलेक्‍टर ऑफिस चौक, धैर्यप्रसाद हॉल चौक ही कामे कंपनी करत राहणार असल्याचे "केएसबीपी'चे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT