Kudnur Gram Sabha Approves No-Confidence Motion Against Sarpanch Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कुदनूर ग्रामसभेत सरपंचांवरील अविश्‍वास ठराव मंजूर

दीपक कालकुंद्रीकर

कुदनूर : कुदनूर (ता. चंदगड) येथील सरपंच शालन चंद्रकांत कांबळे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावावर आज झालेल्या विशेष ग्रामसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. सरपंच शालन कांबळे यांच्या बाजुने 606 तर, विरोधात 1380 मते पडली. 70 मते बाद झाली. त्यामुळे कुदनूरच्या थेट निवडून आलेल्या पहिल्या सरपंच शालन कांबळे यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. दरम्यान, चंदगड तालुक्‍यातील विविध सरकारी कार्यालयातील 150 कर्मचारी व 60 पोलिसांमुळे आज कुदनूरला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

मागच्या महिन्यात उपसरपंच नामदेव कोकीतकर यांच्यासह इतर नऊ सदस्यांनी सरपंच शालन कांबळे यांच्यावर अविश्‍वास ठराव मंजूर केला होता. सरपंच शालन कांबळे या थेट सरपंच म्हणून निवडून आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आजची विशेष ग्रामसभा घेऊन मतदान घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सकाळी 8 वाजता ग्रामसभेला सुरवात झाली. सकाळी 8 ते 11 यावेळेत एकूण 3600 मतदारांपैकी 2099 मतदारांनी मतदानासाठी नावनोंदणी केली. दुपारी 11 ते सध्याकाळी 4.30 पर्यंत मतपत्रिकेद्वारे 2056 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

संध्याकाळी मतमोजणी झाल्यानंतर मतदान अधिकारी तथा ग्रामसभेचे अध्यक्ष चंद्रकांत बोडरे यांनी निकाल जाहीर केला. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आरोग्य विभागाने सर्व मतदारांची पुरेशी काळजी घेतली होती. पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी बंदोबस्त ठेवला होता. 

दोन वर्षे कार्यकाल शिल्लक 
कुदनूर हे चंदगड तालुक्‍यातील मोठे गाव. गेल्या पाच सहा वर्षापासून इथे घडणाऱ्या राजकीय घडामोडी व आंदोलनांमुळे दिवसेंदिवस हे गाव संवेदनशील होत चालले आहे. शासकीय यंत्रणेनेही याची गंभीरतेने दखल घेतल्याचे आजच्या स्थितीवरून जाणवत होते. सद्याच्या कुदनूर ग्रामपंचायतीचा कार्यकाल अजून 2 वर्षे शिल्लक आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT