Kusumagraj is the poet of Maharashtra 
कोल्हापूर

कुसुमाग्रज महाराष्ट्राचे कविनायक 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कवी कुसुमाग्रजांच्या एकूण वाडःमयाचा पिंडधर्म हा कवित्वाचा असून त्यांच्या काव्यवृत्तीचा संचार समग्र साहित्यातून प्रकट झालेला आहे. विविध प्रकारच्या वाडःमयातून उभा राहिलेला हा लेखक असून त्यांच्या विकसनशीलतेच्या खुणा त्यांच्या एकंदर वाडःमयातून प्रकट होतात, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ.अविनाश सप्रे यांनी व्यक्त केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र सभागृहात कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित "कवी कुसुमाग्रजांचे वाडःमयीन व्यक्तिमत्व' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ.मेघा पानसरे होत्या. 

प्रा. डॉ. सप्रे पुढे म्हणाले, ""कुसुमाग्रजांवर शेक्‍सपिअरच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. त्यांची वाडःमयीन प्रतिमा ही द्वंदात्मक स्वरुपाची होती. स्वत:च्या वाडःमयीन व्यक्तिमत्वाशी प्रामाणिक राहून कुसुमाग्रजांनी वस्तुनिष्ठ जीवनदृष्टीतून लेखन केले. त्यातून त्यांची दृष्टी अभिजातवादाकडे झुकलेली होती. त्यांच्या दृष्टीत मानवतावाद, उदारमतवाद आणि आधुनिकतेचा प्रत्ययही येतो.'' 


डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, ""साहित्यिकांची निर्मिती आणि भूमिका ही काळाला नेहमी पथदर्शक राहते. कुसुमाग्रजांची कविता काळाशी लढण्याचे बळ देते 
त्यामुळे वर्तमान काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शब्दांचे महत्त्व समजून घेणे आवश्‍यक आहे.'' यावेळी प्रा. लक्ष्मीनारायण तरोडी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुश्‍मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी आभार मानले. प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे, अनाधी खासबागदार, डॉ.विजया वाडकर आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT