कोल्हापूर

इचलकरंजीतील स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा 

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : शहरात पालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती बिकट बनली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा बोजवारा करत पालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छतागृहांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र रोजच पहावयास मिळते. काही ठिकाणी शौचालयांचे दरवाजे निखळून पडले आहेत. पाण्याच्या टाक्‍या रिकाम्या असून त्याला नळच बसवले नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. मानवी आरोग्य धोक्‍यात येणाऱ्या या स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा आहे. 

कोरोनाच्या काळात पालिकेने दररोज स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचे नियोजन सुरू केले होते. मात्र कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शौचालयांची अवस्था दयनीय बनली असून गैरसोयींची मालिका सुरूच आहे. पे ऍण्ड युज स्वच्छतागृहामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना असुविधांना सामोरे जावे लागत आहे. दुरवस्था, अस्वच्छता अशा गंभीर स्थितीत असणारी शहराची स्वच्छतागृहे असुविधांनी ग्रासली आहेत. नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नुसतीच बांधून ठेवली असून त्यातील सुविधांकडे मात्र पाठ फिरवली आहे. 

शहरातील वर्दळीचे चौक, सार्वजनिक ठिकाणे, स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहेच नाहीत. शौचालयासाठी पाणी हा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी काही ठिकाणी शौचालयाबाहेर व वरती पाण्याच्या टाक्‍या बसवल्या आहेत. मात्र त्यामध्ये पाणीच नाही तर अनेक ठिकाणी टाक्‍यांची दुरवस्था झाल्याने पाणी वाया जात आहे. स्वच्छतागृहांमध्ये दिवाबत्तीची सोय असून नसल्यासारखी आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी स्वच्छतागृहांमध्ये सोयी सुविधांची पूर्तता करणे गरजेचे आहे. 

महिला स्वच्छतागृहांचा पत्ताच नाही 
पुरुषांसाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी स्वच्छतागृहे आहेत. मात्र त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. महिला स्वच्छतागृहांचा तर शहरात पत्ताच नाही. त्यामुळे कित्येक वर्षापासून महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. 

स्वच्छतेबाबत वेळोवेळी सूचना
पाण्याची टंचाई भासल्यास अनेकदा स्वच्छतागृहांची स्वच्छता होत नाही. पे अँड युज स्वच्छतागृहे मक्तेदारकडे आहेत. त्यांना स्वच्छतेबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जातात. सुविधांची पूर्तता करण्याचे काम केले जाते. 
- विजय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक 

संपादन - सचिन चराटी

kolhaur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT