Lack of signatures does not help homes for flood victims 
कोल्हापूर

सह्या नसल्याने  पूरग्रस्तांना घरासाठी मदत नाही 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिका अधिकाऱ्यांच्या सह्या नसल्यामुळे बाधित पूरग्रस्तांना घरबांधणीसाठी शासकीय मदत मिळालेली नाही. अशी तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी आज आयुक्तांकडे केली. व पूरग्रस्तांना ही मदत तातडीने द्यावी,अशी मागणी केली. 

यावेळी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी उपशहर अभियंता रमेश मस्कर आणि हर्षजित घाटगे याच्यासह युवराज दबडे या कनिष्ट अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शहरात पुर्ण बाधित झालेल्या 138 घरांना व अंशता बाधित 600 घरांना घरांना तातडीने मदत देण्याचे मान्य केले. 

कोल्हापूर शहरात ऑगस्ट महिन्यात महापूर आला. पुरामुळे कांही नागरिकांची घरे अशंतः तर कांही नागरिकांची घरे पुर्णतः पडली. अशा घरांना तातडीने राज्यसरकारने मदत दिली आहे. पण अद्यापही ही मदत लाभार्थ्यापर्यंत पोहचलेली नाही. 
यावेळी संजय पवार, विजय देवणे म्हणाले, ""ऑगस्ट महिन्यात महापूर आल्यानंतर सरकारकडून तातडीने ही मदत प्राप्त झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ही मदत आली आहे, पण महसूल विभाग आणि महापालिका अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने ही मदत लोकापर्यंत पोहचलेली नाही.

महापालिकेचे काम केवळ सर्वेक्षण अहवालावर सह्या करण्याचेच आहे. पण अद्याप सह्या का झालेल्या नाहीत?, पैसे शासन देत असताना तुमच्याकडून चालढकल का केली जात आहे?. महपालिकेकडून उशीर झाल्यानेच हे पैसे नागरिकांना मिळालेले नाहीत, अशी तक्रार करत संजय पवार आणि विजय देवणे यांनी आयुक्तांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. यावेळी आयुक्त कलशेट्टी यांनीही याप्रकरणी अधिकाऱ्यांना सूचना देऊनही त्यांनी या सूचनांचे पालन केलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी दोन उपशहर अभियंते आणि एक कनिष्ट अभियंता यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT