Micky Jagtiani sakal
कोल्हापूर

बुद्ध आणि बिझनेस

‘लँडमार्क’ हा एक बिझनेस ग्रुप निर्माण झाला.

सकाळ वृत्तसेवा

मिकी जगतियानी हे लंडनमध्ये राहत होते. साधेच काहीतरी काम करणारे त्यांचे वडील भारतातून नशीब काढायला लंडनला आले होते. मिकीनी कॉलेज पूर्ण केले नाही. त्यांच्यावर एकामागून एक संकटांची मालिकाच कोसळत राहिली. वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत त्यांनी आपले कुटुंब गमावलेले होते. त्यांचा लहान भाऊ रक्ताच्या कॅन्सरने गेला, त्यानंतर वडील हृदयविकाराने निधन पावले आणि त्यानंतर सहा महिन्यांतच आईला देखील कॅन्सर झाला. यावेळी मिकी लंडनमध्ये हॉटेलमध्ये खोल्या साफ करायचे काम करत असत.

पूर्णतः अनाथ झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक अलिप्तता निर्माण झाली. आयुष्याच्या त्या टप्प्यावर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने त्यांना आपलेसे केले. लंडन सोडून ते बहारीनला आले. तिथे १९७३ साली त्यांनी एक छोटेसे लहान मुलांच्या उत्पादनाचे दुकान सुरू केले. हे दुकान चांगले चालू लागले. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि बघता बघता अनेक कंपन्यांचे ते मालक झाले. सकाळपासून रात्रीपर्यंत ते राबत असत. अनेक कंपन्या त्यांनी विकत घेतल्या आणि ‘लँडमार्क’ हा एक बिझनेस ग्रुप निर्माण झाला.

मिकी हे मोठे उद्योगपती झाले. परंतु, अब्जाधीश होऊन देखील त्यांचे राहणीमान अतिशय साधे आहे. त्यांच्याजवळ फक्त एकच किल्ली आहे, ती म्हणजे त्यांच्या एकमेव गाडीची किल्ली होय! त्यांच्या कपाटाला, घराला, खोलीला, ड्रॉवरलाही ते कुलूप लावत नाहीत. घरीदेखील जमिनीवर झोपतात. स्वतःचे खासगी विमान घेण्याची त्यांची ऐपत असून देखील त्यांनी अशी खरेदी केलेली नाही. बुद्ध आणि बिझनेस या दोनच गोष्टी मला आकर्षित करतात, असे ते म्हणतात. त्यांनी भारतामध्ये खूप देणग्या दिल्या आहेत. मुंबई आणि चेन्नई येथील दहा लाख झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण ते करतात. भारतातील आर्थिक विषमता त्यांना अस्वस्थ करून टाकते. पहिल्यांदा भारतात आल्यानंतर मुंबईत दिवसभर ते एका झोपडपट्टीत थांबले.

गरिबी नेमकी काय आहे, हे ते समजून घेत राहिले. अकरा अकरा तास काम करूनही लहान मुलांना जेवायला मिळत नाही, ही विदारक परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली. संध्याकाळी त्यांना एका पार्टीला जायचे होते. जिथे एक मुलगी अंगावरील १९ किलो सोन्याचा भार सहन न झाल्यामुळे बेशुद्ध पडलेली त्यांनी पाहिली. त्यांचे मन आणखी बदलले. भारतातील अनेक अनाथ आश्रमांत ते जातात आणि तिथे जमिनीवर झोपतात.

आपली सर्व संपत्ती ते मृत्युपूर्वी दान करणार आहेत आणि त्याची सुरुवातही त्यांनी केलेली आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झालेले असून अत्यंत साधेपणाने ते जगतात. संपत्ती मिळवणे हे ध्येय असून उपयोग नाही, तर आपल्या अटींवर आयुष्य जगणे हे ध्येय माणसाचे असले पाहिजे, त्यातच पुरुषार्थ आहे, असे त्यांना वाटते. व्यवसायामध्ये अतिशय चतुर असणारे मिकी प्रत्यक्षात या सर्व संपत्तीपासून मात्र अलिप्त आहेत.

डॉ. प्रिया दंडगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT