Shivaji University Kolhapur esakal
कोल्हापूर

धक्कादायक! विद्यापीठ वसतिगृहातील मेसच्या जेवणात आढळल्या अळ्या; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Shivaji University Kolhapur : विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणाचा पंचनामा केला. तसेच जेवणात अळ्या आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

या प्रकारामुळे वसतिगृहातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठातील (Shivaji University Kolhapur) मुलांचे वसतिगृह क्रमांक 1 मधील (Boys Hostel No.1) मेसच्या जेवणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल जेवणावेळी वरणात अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणाचा पंचनामा केला. तसेच जेवणात अळ्या आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या संदर्भात रेक्टरसह विद्यापीठ प्रशासनाला (University Administration) निवेदनपत्र देऊनही दखल घेतली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे वसतिगृहातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 4 व 5 सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस भात आणि वरणामध्ये अळ्या आढळल्या. पुन्हा विद्यार्थ्यांनी रेक्टर यांना पत्र दिले; पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT