The last glory of Rankala Tower, the beginning of conservation 
कोल्हापूर

रंकाळा टॉवरला मिळणार गत वैभव, संवर्धनास सुरवात

राजेंद्र पाटील

फुलेवाडी  ः ऐतिहासिक रंकाळा तलावाचे वैभव टॉवर व नक्षीदार भिंत आहे. या टॉवरच्या संवर्धन कामास सुरवात झाली आहे. सध्या नक्षीदार भिंतीच्या दोन्ही बाजूला अर्ध वळणदार आकाराच्या दगडी पायऱ्या आहेत.या पायऱ्यांवरुन रंकाळा चौपाटी वर जाता येते. या पायऱ्यांच्या कामास सुरुवात झाली आहे. 
कुशल कारागिरांनी टॉवर व भिंतीचे काम काळ्या दगडात नाजूक, प्रमाणबद्ध व कोरीव केले आहे. डोळ्याचे पारणे फिटेल, अशा आखीव-रेखीव, नेत्रदीपक कलाकुसरीने चार मजली टॉवर व नक्षीदार भिंत उभारली आहे. रंकाळा टॉवर व नक्षीदार भिंत हा दगडी कलाकुसरीचा नजराना कोल्हापूरचा अमूल्य ठेवा आहे. 
रंकाळा तलाव राजघाटाच्या समोर, कोल्हापूर गगनबावडा या मुख्य मार्गाला लागून चौकातच चार मजली अष्टकोनी टॉवर उभारण्यात आला आहे. टॉवरचा तळमजला हा जमिनीखाली आहे. तळमजल्यात धुण्याच्या चाव्यांना पाणीपुरवठा करणारा व्हॉल्व आहे. टॉवरचा पहिला मजला बीडाच्या जाळ्यांनी बंदिस्त असून तो मार्गाला समांतर आहे. 
दुसरा मजला चौपाटीला समांतर असून इथूनच टॉवरमध्ये प्रवेश करता येतो. नक्षीदार आठ दगडी कमानीनी हा मजला सुशोभित केला आहे. 
टॉवरच्या तिसरा मजला आठ खुल्या नाजूक दगडी कोरीव खांबावर उभा आहे. टॉवरचे तिसऱ्या मजल्यावर गोल घुमट आहे. 
तळमजला सोडून पहिल्या मजल्यापासून घुमटापर्यंत टॉवरची उंची 15.72 मीटर(51.6फूट)आहे. 
टॉवरच्या दोन्ही बाजूला नक्षीदार दगडी भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीची लांबी 64.65 मीटर तर उंची 4.85 मीटर आहे. नाजूक, कोरीव कलाकुसर असलेल्या या भिंतीच्या मधोमध टॉवर आहे. रंकाळा टॉवर व नक्षीदार भिंत हा कलात्मक, प्रमाणबद्ध कलाकुसरीच्या दगडी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. 

रंकाळा टॉवर व येथील मुख्य प्रवेशद्वार जसे होते. अगदी हुबेहूब त्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न आहे. मूळ कामाला धक्का न लावता कोणतेही बांधकाम, कॉंक्रिटीकरण न करता ऐतिहासिक हेरिटेज वास्तू मजबूत करण्याचा हेतू राहील. 
- सुरत जाधव - आर्किटेक्‍ट, सुरत अंजली असोसिएट्‌स 

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

Sangli Crime : ईश्वरपूर हादरले! लॉजवर नेऊन शीतपेयातून दारू पाजून महाविद्यालयीन तरुणीवर दोघांकडून जबरदस्तीने बलात्कार; मारहाण करत जिवे मारण्याचीही धमकी

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 'राष्ट्रवादी’तर्फे आज निदर्शने

Highway Accident: महामार्गांवरील भीषण अपघातांना बसणार वेसण; अकराशे पोलिसांची २४ तास गस्त, नाशिकसह २५ जिल्ह्यांतील यंत्रणा सक्रिय

SCROLL FOR NEXT