Last year, 70 girls took part in the Earn, Learn scheme 
कोल्हापूर

कमवा, शिका योजनेत  गतवर्षी 70 मुलींनी घेतला ला

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कमवा व शिका योजनेला विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी 70 विद्यार्थिनींनी या योजनेत नाव नोंदणी केली होती. या विद्यार्थिनी विविध प्रकारची कामे करतात. त्याचा त्यांना मोबदला मिळतो. त्यातून या विद्यार्थिनींचा मेस आणि राहण्याचा खर्च पूर्ण होतो. त्यांच्यासाठी नवे वसतिगृहही उभारले आहे. 


विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक कारणातून थांबू नये, यासाठी पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी "कमवा व शिका' योजना विद्यापीठात सुरू केली. याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. तीन दशकांत मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विद्यापीठात आता मुलामुलींचे प्रमाण समसमान आहे. काही अधिविभागांत मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. मुलींत गरजू विद्यार्थिनीही आहेत. दहा वर्षांपूर्वी या विद्यार्थिनींसाठीही कमवा व शिका योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मर्यादित होती; मात्र पाच वर्षांत ही संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी 70 मुलींनी या योजनेसाठी प्रवेश घेतला. या विद्यार्थिनींना तीन ते चार तासांचे काम दिले जाते. महिन्याला त्यांना दोन ते अडीच हजार रुपये मिळतात. त्यातून त्यांची वसतिगृह आणि मेसच्या पैशांची रक्कम पूर्ण होते. गेल्यावर्षी कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष अपुरे राहिले. नव्या शैक्षणिक वर्षात अद्याप वसतिगृहाचे प्रवेश झाले नाहीत; पण यंदाही या योजनेत विद्यार्थिनींचा सहभाग जास्त असेल, असे वसतिगृहाच्या रेक्‍टर सांगतात. 


ही कामे करतात विद्यार्थिनी 
- ग्रंथालय, संगणक लॅब, बगिच्यांची स्वच्छता, विद्यापीठातील मेस 
- जिम्नॅशियम हॉल, रीडिंग रूम, वसतिगृहाची कार्यालये 

कमवा व शिका योजनेचा लाभ विद्यार्थिनीही मोठ्या प्रमाणात घेतात. यातून मिळणाऱ्या पैशांतून त्यांचे शिक्षण होते. पाच वर्षांत विद्यार्थिनींची या योजनेतील संख्या वाढत आहे. मुली गांभीर्याने सर्व कामे करतात. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले असून त्यांना परिस्थितीची जाणीव असते. 
- डॉ. प्रतिमा पवार, रेक्‍टर, शिवाजी विद्यापीठ मुलींचे वसतिगृह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT