Launch of Traffic Safety Campaign at ST Corporation 
कोल्हापूर

'रस्त्यावरील चुकीला माफी नाही' 

शिवाजी यादव

कोल्हापूर - "चालकांवर विश्‍वास ठेवूनच प्रवासी प्रवास करीत असतात मात्र चालकांच्या चुकातून अनेकदा अपघात घडतात. यात रस्त्यावरील चुकीला माफी नसते. शुल्लक चूक असली तरी गंभीर अपघात घडतात. त्यामुळे प्रत्येक चालकाने वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळणे महत्वाचे आहे.'' असे मत मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे यांनी आज येथे व्यक्त केले. 

येथील एसटी महामंडळात वाहतूक सुरक्षीतता मोहिमेला सुरवात झाली. श्री. शिंगारे यांच्या हस्ते या मोहीमेचे उध्दघाटन झाले यावेळी ते बोलत होते. एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे तसेच विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. 

रोहन पलंगे म्हणाले, ""एसटी महामंडळाची व वाहतूक सुरक्षीतता मोहीम ही केवळ ठरावीक दिवसासाठी नाही तर प्रत्येक दिवसासाठी आहे हीच भावना चालकांनी लक्षात ठेवून सुरक्षीत गाड्या चालविणे महत्वाचे आहे. त्यासाठी सुरक्षीततेबाबत दिलेल्या सूचनांचा वापर नियमितपणे केला पाहीजे. त्यातून अपघातांची संख्या व कमी होईल प्रवाशांचा एसटी वरील विश्‍वास अधिक दृड होईल.'' 

आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी सुत्रसंचलन केले. वाहतूक अधिक्षक सतिश खाडे, स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे, चालक वाहक यांत्रीक कर्मचारी उपस्थित होते. 

 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT