Lawyers should work through e-filing ...
Lawyers should work through e-filing ... 
कोल्हापूर

ई-फायलींग करा, कामकाज सुरळीत पार पाडा...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई-फायलिंगसारखे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पाडावे. वकिलांनी काळानुसार बदलून ई-फायलिंगसारख्या तंत्रज्ञानाद्वारे दावे व खटले दाखल करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी केले आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व वकिलांना ई-फायलिंगचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. 

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गावडे म्हणाले, ""कोरोनामुळे लॉकडाउन झाला आहे. न्यायालयातील कामकाज नियमितपणे चालू करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने पक्षकारांची गैरसोय टाळणे व वेळेत प्रकरणे दाखल करण्याकरिता ई-फायलिंग प्रशिक्षणाचा सर्व वकिलांना चांगला फायदा होणार आहे.'' 

जिल्हा न्यायाधीश-3 महेश जाधव, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. विवेक घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव गुरुप्रसाद माळकर, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक संभाजी पाटील, न्यायसंकुलातील कर्मचारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT