Lawyers Ujaval Nikam Speech The Accused Capital Punishment Sangli Marathi News 
कोल्हापूर

'त्या' मारेकऱ्यांना मृत्यूदंड झालाच पाहिजे....

सकाळ वृत्तसेवा

सांगली : हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्यातील सुधीर सदाशिव घोरपडे (वय 24) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय 23) दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवलेकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. शिक्षेबाबत उद्या (ता. 4 फेब्रुवारी ) निर्णय दिला जाणार आहे. 

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, की
 सुधीर घोरपडे यांची बहीण विद्याराणी यांचे लग्न हिवरे येथील शिंदे कुटुंबात झाले होते. लग्नानंतर तिचे सासरचे लोक तिचा छळ करत असल्याचा तिच्या माहेरचा आरोप होता. दरम्यान, विद्याराणी यांनी आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून तिचा सासरच्या लोकांकडून घातपात झाल्याची फिर्याद विटा पोलिसांत दाखल करण्यात आली. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते. त्यामुळे सुधीर घोरपडे शिंदे कुटुंबीयावर चिडून होता.

पाणी मागण्याचा बहाणा करीत..
 21 जून 2015 रोजी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम हे दोघे शिंदे वस्तीवर आले. त्यावेळी घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. घरात तीन महिला होत्या. सुधीर घोरपडे याने पाणी मागण्याचा बहाणा करून प्रभावती शिंदे यांना घरात पाठविले त्यावेळी या दोघांनी घरासमोर बसलेल्या निशिगंधा शिंदे व सुनीता पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघींच्या ओरडण्याच्या आवाजाने प्रभावती शिंदे बाहेर आल्या तेव्हा त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यांचाही त्यात मृत्यू झाला. दोघांनाही न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यांच्या शिक्षेबाबत आज युक्तिवाद झाला. 

मृत्यूदंड दयावा
सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले,"आरोपींनी नियोजनबद्ध थंड खून केला आहे. त्यात तिन महिला निसस्त्र होत्या. घरात पुरूष मंडळी नसतानाच हा खून करण्यात आला. सहा वर्षानंतर सूड घेण्यात आला. आरोपी जरी तरूण असले, तरी नियोजनबद्ध केलेला खूनामुळे ते निरढावलेले असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना मृत्यूदंड देण्यात यावा.'' याबाबत उद्या (ता. 4) शिक्षा सुनावली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

Yavatmal Shaktipeeth Controversy : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीत मोठा घोळ? शेकडो झाडांसह विहिरी गायब झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; 451 आक्षेप दाखल

Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना साखर आयुक्त करा!' माढ्यात दुग्धाभिषेक आंदोलन, शेतकरी-कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना मोठा धक्का! श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी घसरण; अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींना मागे टाकणारा कोण?

SCROLL FOR NEXT