kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : लाखोंची उलाढाल, पण रेकॉर्डच नाही

एलबीटीचा गुंता कायम; साडेतीन हजार व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एलबीटी (स्थानिक संस्था कर) काळात मालाची खरेदी करून विक्रीही केली. त्याचा एलबीटी संबंधितांकडून बिलात लावला गेला. पण, शहरात झालेल्या विक्रीवर जो कर महापालिकेत भरायला हवा, तो भरलाच गेला नाही. त्याची कागदपत्रेही सादर केली नसल्याने लाखोंची उलाढाल झाली असली, तरी ती रेकॉर्डवर आलेली नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिका सात वर्षांपासून जवळपास साडेतीन हजारांवर व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या कराच्या प्रतीक्षेत आहे.

२०११ मध्ये एलबीटी सुरू झाल्यावर महापालिकेने व्यापाऱ्यांची नोंदणी सुरू केली. त्यानुसार संबंधितांचे असेसमेंट करून कराची आकारणी सुरू केली. हा कर शहरात विक्री केलेल्या वस्तूंच्या उलाढालीवर लावण्यात येणार असल्याने शहराबाहेर व शहरात किती विक्री झाली याची कागदपत्रे व्यापाऱ्यांनी महापालिकेला सादर करणे गरजेचे होते. व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर ३१ जुलै २०१५ ला तो बंदही झाला. पाच वर्षांच्या कालावधीत अनेक व्यापाऱ्यांनी असेसमेंट पूर्ण करून महापालिककडे करही भरला. पण, साडेतीन हजार व्यापाऱ्यांनी या काळातील व्यवहाराची कागदपत्रेच दिलेली नाहीत. अभय योजना बंद केल्यावर व्यापारी आता कर भरण्याच्या मानसिककेतच नाहीत. यामुळे महापालिका मात्र मोठ्या उत्पन्नापासून मुकलेली आहे.

२०१८ पासून कॅम्प घेतले जात आहेत. पण प्रतिसाद मिळत नाही. मध्यंतरी महापुराची दोन वर्षे, कोरोना काळ यामुळे व्यापाऱ्यांकडे लक्ष दिलेले नव्हते. पण गेल्यावर्षीपासून चांगली उलाढाल सुरू झाल्याने महापालिकेने जुना कर वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. या व्यापाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यास नोटीस दिल्या आहेत. ठराविक कालावधीनंतर कुणी प्रतिसाद न दिल्यास कर वसुलीसाठी पुढील कारवाई घेतली जाऊ शकते.

दंड व व्याज आकारणी होणार

व्यापाऱ्यांनी २०११ ते १५ या कालावधीतील कागदपत्रे सादरच केली नाहीत, तर महापालिकेकडे असलेल्या उलाढालीच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कर निर्धारण केले जाईल. तसेच, त्याची दंड व व्याज आकारणीही केली जाईल.

कोणती कागदपत्रे हवीत

व्यापाऱ्यांचे त्या कालावधीतील विक्री रजिस्टर

खरेदीची तसेच विक्रीची बिले

शहराबाहेर विक्री केलेल्या मालाची बिले

शहरात किती व शहराबाहेर किती मालाची विक्री केली, याची व्यापाऱ्यांकडून योग्य कागदपत्रे सादर केली, तर त्यांच्यावर त्यानुसारच कर आकारणी होईल. त्यासाठीच आता कॅम्पचे आयोजन केले आहे.

- विश्‍वास कांबळे, एलबीटी प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT