learning driving license is valid till June 30 
कोल्हापूर

शिकाऊ वाहन परवान्याची 30जूनपर्यत कांळजी नाही

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर), : लॉकडाउनच्या काळातील शिकाऊ परवान्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. त्यामुळे शिकाऊ परवानाधारकांना आताथेट कायम परवाना घेता येणार आहे. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन असल्यामुळे राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतील (आरटीओ) वाहन चालवण्याचे शिकाऊ व कायम परवाने देणे बंद होते. त्यामुळे सरकारने कायम परवाना आणि व्यावसायिक वाहन चालवण्याच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत 1 फेब्रुवारी ते 30 जून 2020 या काळात संपणार असल्यास त्यांना दिलासा देत 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु शिकाऊ परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेणाऱ्या व मुदत संपणाऱ्याबद्दल काहीही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शिकाऊ परवानाधारक अडचणीत आले होते. परिणामी शिकाऊ परवानाधारकांना पुन्हा सर्व प्रक्रिया नव्याने करून शिकाऊ परवाना घ्यावा लागण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. 
मुंबई वगळता राज्यभर रोज सुमारे 20 हजार शिकाऊ परवाने काढले जातात. त्यामुळे शिकाऊ परवानाधारकांबाबत निर्णय घेण्याची मागणी होत होती. 
केंद्र सरकारने शिकाऊ परवानाधारकांबाबत राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील परिवहन खात्याने सर्व आरटीओंना पत्र देत कायम परवानाच्या धर्तीवर शिकाऊ परवान्यालाही मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातील शिकाऊ परवान्याला 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. परिणामी तांत्रिकदृष्ट्या मुदतबाह्य झालेल्या शिकाऊ परवानाधारकांना जिवनदान मिळाले असून, त्यांचा पुन्हा शिकाऊ परवान्याची प्रक्रिया करण्याचा मन:स्ताप टळला आहे. सध्या राज्यातील रेड झोन व रेड झोनबाहेरील आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन चालवण्याचे कायम व शिकाऊ परवाने देण्याला सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे ही परवानगी मिळाल्यावर या उमेदवारांना परवाने घेता येणार आहे. 

"वाहन चालवण्याच्या कायम परवान्याच्या धर्तीवर लॉकडाउनच्या काळात मुदत संपलेल्या शिकाऊ परवान्यालाही 30 जून 2020 पर्यंत केंद्राच्या सूचनेनुसार मुदतवाढ दिली आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.' 
- सचिन माने, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, चालक शिरोली पुलाची 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT