Legumes in the mountains ...! 
कोल्हापूर

रानमेवा  डोंगरातच...! 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा-शाहूवाडी तालुक्‍यांतून येणारा रानमेवा यंदा डोंगरातच अडकला आहे. जांभळे, करवंदे, कच्च्या कैऱ्या, बोरं, आवळा, चिंच टोपलीत घेऊन येणाऱ्या महिला संचारबंदीमुळे गावातच अडकून राहिल्या आहेत. त्यांची आर्थिक कमाई बंद असल्याने त्यांच्यात अस्वस्थतेचा सूर आहे. 


जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील महिला जांभळे, करवंदे, कैऱ्या घेऊन दरवर्षी कोल्हापुरात येतात. बाबुजमाल दर्ग्यासमोरील जागेत त्यांच्याकडील रानमेव्याची दलालांकडून खरेदी होते. काही महिला थेट शहरात वणवण भटकत रानमेव्याची विक्री करतात. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी बसून विक्री करून पैशाची जमवाजमव करणाऱ्याही महिला आहेत. साधारणपणे एप्रिलमध्ये जंगलातील रानमेवा घेऊन त्यांची पावले शहराकडे वळतात. शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर लहान मुले-मुली रानमेव्याच्या विक्रीत गुंतलेली असतात. सुटीचा आनंद घेत आर्थिक कमाई करण्याचे त्यांचे दिवस असतात. 


कोरोनामुळे रानमेव्याची आवकच शहरात झालेली नाही. महिनाभर संचारबंदी, त्यात पुन्हा तीन मेपर्यंत वाढलेल्या संचारबंदीच्या दिवसांमुळे त्यांची पंचाईत झाली आहे. तीन मेनंतर पुन्हा संचारबंदीचे दिवस वाढले तर यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी निरंक राहण्याची चिन्हे आहेत. गगनबावड्याकडे शहरातून जाणाऱ्या फुलेवाडी नाका, कुंभी-कासारी कारखाना, कळे, साळवण, पळसंबे, तर करवीर तालुक्‍यातील पिरवाडी, वाशी, कांडगाव, देवाळे, हळदी, कोथळी, कुरुकली, परिते, भोगावती, राधानगरी तालुक्‍यातील घोटवडे, कौलव, सिरसे, आवळी, आणाजे, खिंडी व्हरवडे, गुडाळ, कसबा तारळे, पिरळ, फेजिवडे, राधानगरीसह पन्हाळा-शाहूवाडी तालुक्‍यांच्या रस्त्यांवर रानमेव्याच्या टोपल्या विक्रीसाठी येतात. यंदा हे चित्र पाहायला मिळत नाही. संचारबंदी उठल्यानंतरही ते पाहायला मिळण्याची शक्‍यताही धूसर आहे. 


लाखोंची उलाढाल थांबली 
करवंदे, जांभळे गोळा करण्यासाठी ग्रामीण भागातील विक्रेते दुपारी रानावनात भटकतात. चार तासांत दोघे जण 6 ते 7 किलो करवंदे, जांभळे टोपलीत जमा करतात. शहरातील दलालांना एक टोपली ते पाचशे ते सहाशे रुपयाला विकतात. अशा शेकडो टोपल्या शहर विक्रीला येतात. फणस व रायवळ आंबे यांची विक्री नगावर होते. या सर्वांची शहरात उलाढाल काही लाखांत होते, असे विक्रेत्यांतून सांगण्यात येते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

'ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! कधी आणि कुठे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT