Viral sakal
कोल्हापूर

Leopard Viral Video: दाट धुक्यात हरवलेला पन्हाळगडाजवळ बिबट्याचे दर्शन, वीर शिवा काशीद समाधीजवळचा व्हिडीओ व्हायरल

Panhala Leopard On road : हा प्रसंग त्यांनी कॅमेराबद्ध करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur: पन्हाळ्यावरून कुटुंबासह परतणाऱ्या पर्यटकांना रात्री साडेआठच्या सुमारास पन्हाळागडाच्या मुख्य रस्त्यावर जकात नाका ते बुधवार पेठेदरम्यान असलेल्या छोट्या घाट रस्त्यावरून वीर शिवा काशीद समाधीच्या बाजूला जाणाऱ्या बिबट्याचे दर्शन झाले.

पाऊस व दाट धुक्यात हरवलेला पन्हाळगड पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते. त्यामध्ये कुटुंबासोबत येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. सोमवारीही असेच कुटुंबासह पन्हाळा दर्शन करून व येथील जेवणाचा आस्वाद घेऊन परतणाऱ्या एका पर्यटक कुटुंब मुख्य रस्त्याने परतत होते.

जकात नाक्यापासून खाली जात असताना रस्त्यावरून दौडत जाणारा पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे दर्शन झाले. हा प्रसंग त्यांनी कॅमेराबद्द करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. याबाबत वनविभागाकडे विचारणा केली असता, वनविभागाने मुख्य रस्त्यावरील बाजूस असलेल्या रेडेघाटी परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. तेथील बिबट्या नेहमीच खाद्याच्या शोधात मुख्य रस्ता ओलांडून गडाच्या पायाथ्याशी असलेल्या गावांच्या दिशेने जातो. त्याठिकाणी राहणाऱ्या या बिबट्याचा तो नेहमीचा मार्ग आहे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT