Leopard Attack On Animals In Chandgad Taluka Kolhapur Marathi News
Leopard Attack On Animals In Chandgad Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगड तालुक्‍यात बिबट्याचा जनावरांवर हल्ला

सुनील कोंडुसकर

चंदगड : पार्ले धनगरवाडा (ता. चंदगड) येथे मालकी हद्दीत चरणाऱ्या रेडकावर व गायीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ही जनावरे जखमी झाली. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. सोमवारी (ता. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

बिबट्याने मालकी हद्दीत चरणाऱ्या जनावरांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये धुळू बमु फोंडे यांचे दोन वर्षाचे रेडकू, तर पोलिस पाटील सखाराम फोंडे यांची गाय जखमी झाली. बिबट्याच्या हल्यामुळे बिथरलेली जनावरे पाहून फोंडे यांच्या आईने आरडाओरड केल्याने बिबट्या जंगलात पळून गेला.

वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक गणेश बोगरे, वनमजूर तुकाराम गुरव, चंद्रकांत बांदेकर, अर्जून पाटील, विश्‍वनाथ नार्वेकर यांनी धनगरवाड्यावर जाऊन जखमी जनावरांची पाहणी केली. वनानजीकच्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात बांद्राई धनगरवाड्यावर बिबट्याच्या हल्यात म्हैस जखमी झाली आहे. वाळलेले गवत आणि कठीण जमीन यामुळे त्याच्या पायाचे ठसे आढळले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT