Leopard male and female on the shack 
कोल्हापूर

पन्हाळ्यावर बिबट्या नर-मादी 

सकाळवृत्तसेवा

पन्हाळा : आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येथील तीन दरवाजा शेजारील नरसोबा खिंडीखाली एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याच्या नर आणि मादीचे लोकांना दर्शन झाले. तीन दरवाजाच्या खालील बाजूच्या दगडी घळीतून ही जोडी बाहेर पडली. त्यानंतर अवध्या काही अवधीत नर खाली कुरणाच्या दिशेने निघून गेला तर मादी बराच वेळ तिथेच थांबली आणि नंतर दगडी घळीत दिसेनाशी झाली. 

पन्हाळा तटबंदीखाली बऱ्याच दिवसापासून बिबटयाची चाहूल लागत आहे. पावनगडच्या खाली काही वेळेस मादी आणि तिचे पिल्लू तर पुसाटीखाली नर बिबटयाचे परिसरातील लोकांना दर्शन होत होते. आज सायंकाळी माजी पोलिस पाटील भिमराव काशिद, संजय भालेकर आणि महेश जगदाळे हे तीन दरवाजा शेजारील नरसोबा खिंडीवरील तटबंदीवर बसले असता त्यांना खाली पायवाटेवरून बिबटया येताना दिसला, त्यांच्या पाठोपाठ दुसरा बिबटया आला. 

ग्रामस्थांनी छायाचित्रकार धीरज कुराडे यांना मोबाईल करून बोलावून घेतले आणि छायाचित्रे घेतली. बिबटयाच्या जोडीमुळे पन्हाळा परिसरातील जंगलाला जाग आली आहे. या परिसरात बिबटयासह गव्यांचे दररोज दर्शन लोकांना होऊ लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT