Let's get ready for self defense ...! 
कोल्हापूर

स्वसंरक्षणासाठी सज्ज होऊया...! 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : सार्वजनिक ठिकाणी चोरटे स्पर्श, घरगुती हिंसाचार असो किंवा वाढत्या अत्याचाराच्या घटना असो महिलांची सुरक्षितता हा आजही महत्वाचा प्रश्‍न झाला आहे. आजवर कितीतरी ऍप्स सुरू झाली, हेल्पलाईन्स आल्या परंतू फारसा फरक पडला नाही. अशा वेळी स्वतःच स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध होण्याखेरीज पर्याय नाही. त्यासाठी महिला, मुलींना सक्षम बनविण्याची गरज आहे. हे ओळखून शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातर्फे "बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान राबविले जात आहे. 

चार वर्षापुर्वी या अभियानाची सुरूवात झाली. या अभियानांतर्गत विद्यापीठातील 30 विभाग, विद्यापीठांशी संलग्नित 200 हून अधिक महाविद्यालये आणि ग्रामीण भागातील बचत गटांतील महिला, युवतींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पथनाट्ये, कार्यशाळा, पोस्टर प्रेझेंटेशन यासह निंबध स्पर्धा, घोषवाक्‍य स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या अत्याचाराविरोधात प्रबोधनाचा जागर केला जातो आहे. तसेच तरूणी, महिला स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हाव्यात यासाठी स्वसंरक्षण शिबीरेही घेण्यात येतात. या शिबीरामध्ये मार्शल आर्ट, कराटे आदींचे प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत दहा हजाराहून अधिक युवती, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले आहेत. 

दरवर्षी विद्यापीठातील प्रत्येक विभागात विविध स्पर्धा, स्वसंरक्षण शिबीराचे आयोजन केले जाते. जेणेकरून या तरूणी स्वतःचे संरक्षण करू शकतील आणि समाजातील घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना टळतील. समाजशास्त्र विभागातर्फे दरवर्षी 26 जानेवारीला होणाऱ्या संचलनात "बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा चित्ररथ सादर केला जातो. तसेच ग्रामीण भागात, दुर्गम वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या महिलांसाठी हे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. 

महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या तरूणी तसेच महिला या पुढची पिढी घडविणार आहेत. महिला सक्षमीकरणाची बीजे त्यांच्यामध्ये रूजली तर पुढील पिढीही सक्षम होईल. या उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत जास्तीत जास्त तरूणी, महिलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. 
- प्रा. डॉ. प्रतिभा देसाई, समन्वयिका, "बेटी बचाओ, बेटी पढाओ' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT