Let's give strength to pollution free Diwali; Emphasis should be placed on environmentally friendly festivals 
कोल्हापूर

चला प्रदूषणमुक्त दिवाळीला बळ देऊया ; पर्यावरणपूरक उत्सवाकडे भर हवा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : शैक्षणिक संस्थांसह पर्यावरणविषयक कार्यरत संघटनांनी प्रदूषण रोखण्यात यशस्वी पावले उचलली, त्याचा परिणाम म्हणून दहा-बारा वर्षांत दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाचा आलेख घटताना दिसतो; पण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांत बसण्याची मजल मारता आलेली नाही. फटाकेमुक्त दिवाळी न केल्यास प्रदूषणात भर पडणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर देत प्रदूषणमुक्तीला बळ देण्याची गरज आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहा ते सात महिने वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. त्याला हवा प्रदूषणही कारणीभूत आहे. कोरोनाचा विषाणू एका वेगळ्या स्थितीत निर्माण झाला. तो वेगाने प्रसारित झाला. मात्र, तो कोणत्या मार्गाने व कोठून येतो, हे समजत नाही. त्याचे गांभीर्य नागरिकांना नाही. केंद्र, राज्य सरकारने प्रत्येक दिवशी जनजागृती व्हावी, यासाठी प्रयत्न केला. श्‍वसनाचे आजार रोखण्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी योग्य पर्याय आहे. संघटितपणे दिवाळी फटाकेमुक्त साजरी करूया, असा संकल्प करण्याची हीच वेळ आहे. शासकीय नियमांना बगलही देऊन चालणार नाही. 
- डॉ. एस. डी. कदम, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र, सायबर. 

शिवाजी विद्यापीठ, शैक्षणिक संस्था व पर्यावरणविषयक कार्यरत संस्थांनी विविध सणांच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती केली आहे. दहा-बारा वर्षांत त्याची चळवळ सुरू झाल्याने ध्वनी व हवेचे प्रदूषण कमी होत असल्याचे दिसते आहे. नागरिकांत त्यादृष्टीने परिवर्तन होत आहे. मात्र, केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांचा विचार करता आजही आपण प्रदूषण रोखण्यात कमी पडतो. प्रदूषणात थोडी जरी वाढ झाली तरी त्याचा धोका मानवी आरोग्याला होणार आहे. परिणामी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे फायद्याचे ठरणार आहे. 
- डॉ. पी. डी. राऊत, माजी विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ. 

दिवाळी धुमधडाक्‍याने साजरी केली जाते. फटाक्‍यातून कोणते वायू बाहेर पडतात, याचा विचार कोणी करत नाही. पर्यावरण, आरोग्यावर काय परिणाम होतात, याची दखल कोणाला घ्यावीशी वाटत नाही. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, मुले-मुली, पक्षी-प्राण्यांच्यावर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होतो. ताण-तणाव, निद्रानाश, रक्तदाब यासारखे आजार प्रदूषणातून उद्‌भवाताना दिसतात. त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळी करण्याकडे प्रत्येकाचा कल असावा. 
- डॉ. अक्षय थोरवत, विभागप्रमुख, पर्यावरण अभियांत्रिकी, केआयटी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Paithan News : पैठणमध्ये नगर पालिका निवडणुकीआधी जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार; महिला उमेदवाराच्या घरासमोर अघोरी साहित्य!

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

SCROLL FOR NEXT