Let's have a meeting with the Deputy Chief Minister regarding the demands of Sarathi
Let's have a meeting with the Deputy Chief Minister regarding the demands of Sarathi 
कोल्हापूर

"सारथी'च्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ ः मुश्रीफ

संदीप खांडेकर

कोल्हापूर : सारथी संस्थेच्या मागण्यांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली. सकल मराठा समाजातर्फे "सारथी'ला स्वायत्तता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 
नऊ महिन्यांत "सारथी'चे कामकाज ठप्प असून, ते पूर्ववत सुरू करावे, "सारथी'ची स्वायतत्ता द्यावी, या व इतर मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापक बैठकीत पुणे येथे लाल महालावर आंदोलन जाहीर केले होते. त्याची दखल घेऊन शासनाने "सारथी'ला स्वायतत्ता देण्याचा आदेश दिल्याबद्दल मुश्रीफ यांचे आभार व्यक्त करण्यात आले. "सारथी'सह मराठा आरक्षण सोडवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, याविषयी चर्चा झाली. 
या वेळी मुश्रीफ यांनी "सारथी'बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या वेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, ऍड. गुलाबराव घोरपडे, संदीप देसाई, प्रताप ऊर्फ भय्या माने, प्रकाश गाडेकर, शाहीर दिलीप सावंत, मयूर पाटील, अवधूत पाटील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT