Let's keep Panchganga smooth! 
कोल्हापूर

पंचगंगा अशीच ठेवूया नितळ!

सुधाकर काशिद

 कोल्हापूर : लॉकडाउननंतर पंचगंगेत प्रदूषित घटक मिसळण्याचे कमी झालेले प्रमाण व त्यामुळे नितळ झालेले पंचगंगेचे पात्र, याचा तीन पातळ्यांवर अभ्यास करण्यासाठी आज पंचगंगेच्या पाण्याचे नमुने सहाव्यांदा तपासण्यासाठी घेतले. महिन्याभरात दर पाच दिवसांनी नमुने घेतले जात आहेत. पाण्यातील भौतिक, रासायनिक, जैविक बदल तपासले जात आहेत. लॉकडाउननंतर नितळ झालेले पंचगंगेचे पाणी यापुढेही तसेच कायम राहावे, यासाठी या सर्वेक्षणातून उपाययोजना राबविली जाणार आहे. प्रशासनाबरोबर पंचगंगा नितळ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. 

मुख्य पात्रच नव्हे; तर पंचगंगा ज्या नद्यांच्या संगमातून तयार झाली आहे अशा कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या नद्यांच्या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले जात आहेत. शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभाग, महापालिका पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ हे काम करत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कोरोना संसर्ग उपाययोजनांबरोबर पंचगंगा नदी सद्यस्थितीत आहे तशी पुढेही राहील, यासाठी हे काम स्वतंत्रपणे सुरू केले आहे. 
आतापर्यंतच्या नमुन्यातून पाणी नितळ झाले आहे. नदीमार्गात येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. काही सांडपाण्याचे नाले कोरडे पडलेत. पाण्यात प्राणवायूचे प्रमाण वाढले आहे. जलपर्णीचा थर जवळजवळ संपलाच आहे. पाण्याचा रंग तेरवाड बंधाऱ्यापुढे काहीसा हिरवट; पण अन्य ठिकाणी नितळ झाला आहे, असे प्राथमिक निष्कर्ष आहेत. अर्थात, त्याला अंतिम स्वरूप येण्यास आणखी काही निरीक्षणांची गरज लागणार आहे.

विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभागाचे डॉ. पी. डी. राऊत, महापालिका पर्यावरण विभागाचे समीर व्याघ्रांबरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड नमुने घेण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभागी आहेत. नमुन्यांचे परीक्षण करून अंतिम अहवाल तयार होणार आहे. पंचगंगेच्या पात्रात अगदी क्वचित ठिकाणी नैवेद्य सोडला आहे. एरवी मुख्य घाट नैवेद्याने भरलेला असतो. पात्र इतके नितळ आहे की, काठावर चार-पाच फूट खोल पाण्याचा तळ स्पष्टपणे दिसतो. काठावर जलचर पक्ष्यांचा वावर वाढला आहे. 

नमुने घेण्यात येणारी ठिकाणे 
* पंचगंगा मुख्य घाट 
* राजाराम बंधारा 
* आसुर्ले-पोर्ले बंधारा 
* खडक कोगे 
* बहिरेश्‍वर 
* हळदी बंधारा 
* प्रयाग संगम 
* शिरोली पूल 
* रुई बंधारा 
* शिरोळ बंधारा 
* तेरवाड बंधारा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT