Letter to the Board of Secondary Education of the Sports Office for re-examination of marks 
कोल्हापूर

ग्रेस गुण उलट तपासणीसाठी   क्रीडा कार्यालयाचे माध्यमिक शिक्षण मंडळाला पत्र 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : यंदा दहावीतील किती विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले, याची उलट तपासणी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने एक पाऊल पुढे टाकले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला क्रीडा कार्यालयातर्फे तसे पत्र दिले आहे. गुणपत्रकात ग्रेस गुण न मिळाल्याने खेळाडू विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा सूर कायम आहे. 
शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ग्रेस गुण दिले जातात. दहावी व बारावीतील विद्यार्थी खेळाडू त्यासाठी स्पर्धेतील कामगिरीची प्रमाणपत्रे क्रीडा कार्यालयाकडे पाठवतात. क्रीडा कार्यालय प्रस्ताव शिक्षण मंडळाला सादर करून संबंधित खेळाडूंना ग्रेस गुण देण्याचे आवाहन करते. यंदा शिक्षण मंडळाने क्रीडा आयुक्तांनी दिलेले पत्र बेदखल करत सुमारे 79 खेळाडूंना ग्रेस गुण बहाल केले नाहीत. क्रीडा कार्यालयाने हे पत्र मेमध्ये शिक्षण मंडळाला दिले होते. 
ग्रेस गुण न मिळालेल्या खेळाडूंनी गुण का मिळाले नाहीत, अशी विचारणा क्रीडा कार्यालयाकडे केली आहे. खेळाडूंचा रोष क्रीडा कार्यालयावर असल्याने क्रीडाधिकारी अस्वस्थ आहेत. वस्तुतः प्रस्ताव सादर केल्याप्रमाणे खेळाडूंना ग्रेस गुण देणे आवश्‍यक होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी उलट तपासणी सुरू केली आहे. शिक्षण मंडळाला एकूण दिलेल्या प्रस्तावांपैकी किती खेळाडूंना ग्रेस गुण दिले, तसेच ज्यांना गुण दिले नाहीत त्यामागची कारणे काय, अशी विचारणा करणारे पत्र पाठवले आहे. क्रीडाधिकारी बालाजी बरबडे यांनी ते मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात जाऊन दिले आहे. मंडळाचे अधिकारी रजेवर असल्याने ते हजर झाल्यावर यासंदर्भातील माहिती क्रीडा कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे. 

ग्रेस गुण न मिळाल्याने खेळाडू अस्वस्थ आहेत. ते गुण त्यांच्या हक्काचे आहेत. त्यापासून ते जर वंचित राहणार असतील तर ते क्रीडा कार्यालयालाही मान्य नाही. त्यांना गुण मिळावेत, हीच भूमिका आहे. शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला ग्रेस गुण न देण्यामागची कारणे काय, या संदर्भातले पत्र आज दिले आहे. 

- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT