Libraries Will Get Overdue Grants Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

ग्रंथालयांना मिळणार थकीत अनुदान, "या' कारणामुळे अडकली होती रक्कम... यंदाच्या पहिल्या हप्त्याची मात्र प्रतीक्षाच

अवधूत पाटील

गडहिंग्लज : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना गतवर्षीचा अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाला. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्या रक्कमेतही 59 टक्के कपात करण्यात आली होती. ग्रंथालयांचे हे थकीत अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर गतवर्षीच्या दुसऱ्या हप्त्याची ही थकीत रक्कम देण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढले. सार्वजनिक ग्रंथालयांच्या खात्यावर लवकरच ही रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, यंदाच्या पहिल्या हप्त्याची अद्याप प्रतीक्षाच आहे. 

कोरोनाचा फटका सर्वच घटकांना बसला. सहाजिकच राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला. जमा-खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी खर्चावर निर्बंध घातले. आरोग्य, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन विभाग वगळता अन्य विभागांचा खर्च 33 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ग्रंथालयांचे गतवर्षीचे अनुदान रखडले होते. तब्बल तीन महिने उशिरा गतवर्षीच्या अनुदानाचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. ड वर्गातील ग्रंथालयांना संपूर्ण रक्कम मिळाली होती. पण, अ, ब, व क वर्गातील ग्रंथालयांची 59 टक्के रक्कम कपात केली.

सदरचे थकीत अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला यश आले असून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने थकीत अनुदान देण्याला मंजूरी दिली आहे. राज्यातील ग्रंथालयांच्या थकीत अनुदानापोटी 30 कोटी 93 लाख 75 हजार रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांतर्फे हे अनुदान लवकरच सार्वजनिक ग्रंथालयांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याला सुरवात झाली तरी अद्याप यंदाच्या पहिल्या हप्त्याचा पत्ता नाही. वास्तविक दरवर्षी या महिन्यात पहिला हप्त्याची रक्कम जमा केली जात होती. त्यामुळे यंदाच्या पहिल्या हप्त्यासाठी ग्रंथालयांना अजून किती काळ वाट पहावी लागणार हा प्रश्‍न आहे. 

ग्रंथालये 31 पर्यंत कुलूपबंदच... 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. ग्रंथालयात वाचकांची रहदारी असते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मार्च महिन्याच्या मध्यात सार्वजनिक ग्रंथालयांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील 635 ग्रंथालयांना कुलूप लागले. सध्या 31 ऑगस्टपर्यंत ग्रंथालये बंदच ठेवण्याचे आदेश आहेत.

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT