The light given to life by Panati
The light given to life by Panati 
कोल्हापूर

पणतीने दिला जगण्याला प्रकाश

मतीन शेख

कोल्हापूर ः: दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा अन्‌ मिनमिणत्या दिव्याचा तेजोमय सण, पणती हेच सणाचं जणू प्रतीकच, याच प्रतिकाला हाताशी घेत 72 वर्षाच्या नजमा सय्यद जगण्यातला प्रकाश शोधत आहेत. महाद्वार रोडवर रस्त्याच्या कडेला 10 वर्षे पणत्यांच्या विक्रीतून चार पैसे जोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न गलबलून सोडणारा आहे. 
नजमा भाभींचे बालपण गरिबीतच गेलं. लग्न होऊन त्या शाहूपुरीत आल्या. पतीच्या सोबतीने अगरबत्तीचा कारखाना उभारला. संसार वेलीवर तीन फुलं उमलली. ती मोठी केली पण आनंदाचा संसार सुरु असतानाच 20 वर्षापूर्वी पतीचं निधन झाले. अन्‌ संसाराला घरघर लागली. मुलांच्या वाटा बदलल्या. पण नजमा भाभींनी स्वाभिमान सोडला नाही. 
महाद्वाररोडवर पणती, उटणे घेण्याची विनंती करताना काहीजण लांबूनच नकार देतात तर काही पणतींच्या किंमतींची चौकशी करत घासघीस करतात. तेव्हा त्या म्हणतात "काचेच्या चकमकीत दुकानातून आहे, त्या किमतीला वस्तू घेता, इथं माझ्या पोटाला पण दोन रुपये मिळू द्या, दहाला दोन आहेत. पण तुम्ही आलायसा माझ्याकडं तर घ्या दहाला तीन.' यावेळी मात्र समोरचा ग्राहक बरं द्या, आजी', असा होकार टाकतो. तेव्हा नजमा यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. दिवाळी, दसरा, गणपती उत्सव हे त्यांच्या आधाराचे सण. दिवाळीत पणती, उटणे विकणे. दसऱ्याला नवधान्य विकणं हे त्याचं काम, दिवसाल्या मिळणाऱ्या शंभर, दिडशे रुपयावर ते औषधाचा, रोजचा खर्च भागावतात. 

दिपावलीत "अली',
नजमा भाभी म्हणतात,"दिपावलीत "अली' आहे तर रमजानमध्ये "राम' आहे. हे सर्व सण उत्सव लोकांना आनंद देतात. माझ्या जगण्यालाही हे सणच आधार आहेत. आल्लाह कृपाळू आहे. अन्‌ आई अंबाबाईचा आशिर्वाद ही माझ्यावर आहे. म्हणून तर मी तिच्या दारात बसून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.' 

- संपादन  ः यशवंत केसरकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT