a limited stock of alcoholics will be distributed in belgum 
कोल्हापूर

एका व्यक्‍तीला फक्त 2.3 लिटर व्हिस्की तर 18 लिटर बिअर मिळणार...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - तब्बल 41 दिवसानंतर मद्यदुकाने सुरु होणार असली तरी मद्यपींची केवळ मर्यादीत मद्यसाठा वितरीत केला जाणार आहे. एका व्यक्‍तीला 2.3 लिटर व्हिस्की, रम, स्कॉच व इतर तर 18 लिटर बिअर खरेदी करता येणार आहे. त्यापेक्षा अधिक मद्य खरेदी करता येणार नाही. तसेच दुकानदारांनी बाहेर बॅरिकेड्‌स लाउन सामाजिक अंतर राखण्याची व्यवस्था करण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. मद्य विक्री आणि खरेदी करणाऱ्यांनी सक्‍तीने मास्क परिधान केले पाहिजे. तसेच मद्याच्या दरात देखील वाढ होणार असून नवीन दर लवकरच लागु होणार आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून मद्यदुकाने बंद असल्याने मद्यपींची घालमेल वाढली आहे. विदेशी दारु मिळणे बंद झाल्याने तळीराम गावठी आणि काजू दारु रिचवत आहेत. मात्र, सोमवार (ता.4) पासून मद्यदुकाने करण्याचा निर्णय अबकारी खात्याने घेतला असल्याने मद्यपींना एकप्रकारे आनंदाची बामती ठरली आहे. मद्यपी जास्त मद्य खरेदी करण्याची शक्‍यता असल्याने सर्वांना मद्य मिळावे. यासाठी मर्यादीत मद्यसाठा वितरीत केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी सात पर्यंत सीएल 2 आणि सीएल 11 (एमएसआयएल) दुकाने सुरु राहणार आहेत. दुकानासमोर जास्त गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने सामाजिक अंतर राखण्यासाठी दुकानदारानी बॅरिकेड्‌ची व्यव्यस्था करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी सुचना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकून 270 मद्यदुकाने सुरु होणार आहेत. त्यामध्ये 66 एमएसआयएल दुकाने आहेत. वाईन शॉप आणि एमएसआयएल अशी एकून शहरातील 100 मद्य दुकाने उद्यापासून सुरु होणार आहेत. मद्य खरेदी करणाऱ्यांना मास्कची सक्‍ती करण्यात आली आहे. अशी माहिती अबकारी उपायुक्‍त बसवराज यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT